नरेंद्र येरावार उमरी /गोरठा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, युवकांचे प्रेरणास्थान, प्रखर विचारवंत, ख्यातनाम वक्ते, युवा कीर्तनकार हभ...
नरेंद्र येरावार उमरी /गोरठा
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार, युवकांचे प्रेरणास्थान, प्रखर विचारवंत, ख्यातनाम वक्ते, युवा कीर्तनकार हभप सोपानदादा कनेरकर यांचे दिनांक 30 ऑक्टोबर रोज शुक्रवारी सकाळी श्रीक्षेत्र गोरठा येथील गणपती मंदिरात भव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र गोरठा येथील श्री गणपती मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमानिमित्त गेल्या चार दिवसापासून श्री गणेश महापुराण व कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. शुक्रवारी सकाळी युवा कीर्तनकार हभप सोपानदादा कनेरकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या कीर्तनाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गोरठा येथील गावकरी मंडळी व मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.......

COMMENTS