नरेंद्र येरावार
उमरी
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी उमरी तालुक्यातील सोमठाणा येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधला.
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, आमचे सरकार पाठीशी आहे.असे सांगून धीर दिला.
यावेळी उमरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, सुधाकरराव देशमुख धानोरकर, तहसीलदार मंजुषा भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस पाटील, पोलिस अधिकारी, भाजपाचे असंख्य कार्यकर्त्यांसह शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या अडचणी व दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.
उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले असून हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करावी, 100% पीक विमा मंजूर करावा, सरसकट कर्जमाफी करावी आणि नवीन कर्ज वाटप करण्यात यावे अशीही मागणी शेतकऱ्यांनी केली.
........

COMMENTS