ऊस आला दारी, बॉयलर पेटला भारी; गळीत हंगामाची झाली तयारी.. एम.व्ही.के. ऍग्रो व डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गुळ पावडर कारखान्याच्या गाळप हंगामाचा उत्साहात शुभारंभ

बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळ्यात शेतकरीहिताच्या विविध योजनांची घोषणा; सभासद शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ३१०० रुपयांचा दर नरेंद्र येराव...


बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन सोहळ्यात शेतकरीहिताच्या विविध योजनांची घोषणा; सभासद शेतकऱ्यांना यंदा प्रतिटन ३१०० रुपयांचा दर

नरेंद्र येरावार 

उमरी 

उमरी तालुक्यातील कुसुमनगर-वाघलवाडा येथील एम.व्ही.के. ऍग्रो फूड प्रॉडक्ट लिमिटेडच्या सहाव्या गाळप हंगामाचा, तसेच डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गुळ पावडर कारखान्याचा चौथ्या गाळप हंगामाचा शुभारंभ शनिवार, दि. २६ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात पार पडला असून बॉयलर अग्निप्रदीपन आणि गव्हाण पूजनाच्या विधीने नव्या गाळप हंगामाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. या वेळी व्ही.पी.के. उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष मारोतराव व्यंकटराव पा. कवळे गुरुजी यांनी शेतकरी हिताच्या विविध योजनांची घोषणा करत दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी संस्थात्मक पातळीवर मदतीचा हात देण्याचा संकल्प व्यक्त केला.

संत-महंतांच्या शुभाशीर्वादाने पार पडलेल्या या सोहळ्यास प.पू.प.म. श्री. श्री. श्री. १००८ महंत यदुबन गुरु गंभीरबन महाराज, प.पू. श्री. आनंदपुरी गुरु दत्तपुरी महाराज, परमपूज्य 108 सद्योजात निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराज नागठाणेकर, प.पू. श्री. बामेराज बाबा कपाटे यांची उपस्थिती होती. दुपारी १२.१० वाजता बॉयलर अग्निप्रदीपन व पूजाविधी, त्यानंतर गव्हाण पूजन करण्यात आले.

बॉयलर अग्निप्रदीपनाचा मान प्रगतशील शेतकरी मारोती शेषेराव पा. कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी (बाभळी, ता. धर्माबाद) तसेच साईनाथ दशरथ पा. ढगे व त्यांच्या सुविद्य पत्नी (हिरडगाव, ता. उमरी) यांना देण्यात आला. तर गव्हाण पूजनाचा मान प्रगतशील शेतकरी अमृतराव शिवाजी पा. डोईफोडे (इज्जतगाव, ता. नायगाव) तसेच बाबुराव शंकरराव पा. शिंदे (बोळसा, ता. उमरी) यांना देण्यात आला.

यावेळी बोलताना चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी यंदाच्या दुष्काळी परिस्थितीचा विशेष उल्लेख केला. त्याचबरोबर कारखान्याचे सभासद व शेअर्सधारक असलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी यंदाच्या गाळप हंगामात एक टन उसाला ३१०० रुपये दर जाहीर झाल्याचे त्यांनी सांगितले. कारखान्याशी सभासद म्हणून जोडलेल्या शेतकऱ्यांना या दरवाढीचा थेट लाभ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप कारखान्याचे शेअर्स घेतलेले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कारखान्याचे शेअर्सधारक होऊन सभासदत्व स्वीकारावे आणि उपलब्ध होणाऱ्या दरवाढीच्या लाभाचा फायदा घ्यावा, असे आवाहनही कवळे गुरुजी यांनी आपल्या भाषणातून केले.

यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर पाणीटंचाई, सिंचनाची समस्या आणि उत्पादनातील घट अशा विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचा मनोदय कवळे गुरुजी यांनी व्यक्त केला.

दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी कोल्हापूर येथे प्रशिक्षण घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना १० लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच दुष्काळाच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना १५ लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हे कर्ज शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून अध्यक्ष व सचिव यांच्या परवानगीने देण्यात येणार असून, या निधीचा उपयोग शेततळे, सिंचन विहीर, जलसंधारणाच्या उपाययोजना तसेच ऊस पिकासाठी ठिबक सिंचन उभारण्यासाठी करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० टक्के व्याजमाफी देण्याची तरतूद करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या शेतात विहीर अथवा बोअरवेल उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी ५० हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या योजना व्ही.पी.के. पतसंस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून, संबंधित शेतकरी एम.व्ही.के. अथवा व्ही.पी.के. कारखान्याचा शेअर्सधारक असणे आवश्यक असल्याचे कवळे गुरुजी यांनी सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित करताना कवळे गुरुजी यांनी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी आपला ऊस इतरत्र न देता कारखान्याला देण्याचे आवाहन केले. “हा केवळ कारखाना नाही, तर शेतकऱ्यांची कामधेनू आहे. या कामधेनूवर माझ्यापेक्षा तुमचा अधिक अधिकार आहे,” असे सांगत त्यांनी कारखाना आणि शेतकरी यांच्यातील नाते अधोरेखित केले.

ऊस तोलणीबाबतही त्यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. “शेतकऱ्यांनी केवळ कारखान्यावर विश्वास ठेवून न राहता, आपला ऊस कोणत्याही काट्यावर तपासून आणावा,” असे स्पष्ट सांगत त्यांनी ऊस तोलणीतील पारदर्शकतेवर भर दिला. शेतकऱ्यांचा विश्वास हीच कारखान्याची खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.

एम.व्ही.के. ऍग्रोचा सहावा आणि डॉ. शंकरराव चव्हाण जागरी गुळ पावडर कारखान्याचा चौथा गाळप हंगाम सुरू झाल्याने परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गाळप हंगाम आव्हानात्मक असला तरी कारखाना व्यवस्थापनाने शेतकरीहिताच्या विविध योजनांवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कार्यक्रमास शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार, संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्ही.पी.के. उद्योग समूहाचे सीईओ संदीप मारोतराव कवळे, कार्यकारी संचालक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले...

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group