नांदेड (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत अप्पर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा वरिष्ठ IPS अधिकारी डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेडमध्ये भव्य रक्तदान शिबिर, वृक्षारोपण आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
सन 2007 बॅचच्या सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार व मित्रपरिवाराच्या वतीने या विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्वतः डॉ. रवींद्रकुमार सिंगल उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते रक्तदान करणाऱ्या 'रक्तदानवीरांचा' सन्मान करण्यात येणार आहे.
या शिबिरात रक्तदानासोबतच वृक्षारोपण, नेत्र तपासणी आणि मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून आरोग्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
हा कार्यक्रम रविवार, दि.27 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालय, वजिराबाद, नांदेड येथे होणार आहे. या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन 2007 बॅचच्या पोलीस व मित्रपरिवारातर्फे करण्यात आले आहे.

COMMENTS