नांदेड:महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या उद्देशाने प्रकाश तुकाराम कांबळे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी ...
नांदेड:महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या उद्देशाने प्रकाश तुकाराम कांबळे यांची नांदेड जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे अध्यक्ष तथा शिक्षक आमदार आदरणीय ज. मो. अभ्यंकर साहेब यांच्या आदेशान्वये करण्यात आली आहेशिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या सूचनेनुसार हे नियुक्तीपत्र जारी करण्यात आले आहे. प्रकाश कांबळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
या निवडीनंतर राज्य उपाध्यक्ष विठूभाऊ चव्हाण, नांदेड जिल्हाध्यक्ष श्री संतोषजी आंबुलगेकर सर, बंडेवार सर यांच्यासह शिक्षक सेनेच्या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांनी आमदार ज. मो. अभ्यंकर साहेब यांचे विशेष आभार मानले आहेत.
प्रकाश कांबळे यांच्या निवडीमुळे नांदेड जिल्ह्यात शिक्षक सेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होईल आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यास गती मिळेल, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या निवडीबद्दल जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळातून व शिक्षक बांधवांकडून प्रकाश कांबळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS