३ हजारांहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी; १ हजारांपेक्षा अधिक मोतीबिंदू रुग्णांची नोंद — पात्र रुग्णांवर नागपुरात मोफत शस्त्रक्रिया किनवट, ...
३ हजारांहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी; १ हजारांपेक्षा अधिक मोतीबिंदू रुग्णांची नोंद — पात्र रुग्णांवर नागपुरात मोफत शस्त्रक्रिया
किनवट, ता. १४ (बातमीदार) : आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त संदेश केराम सोशल फाउंडेशन व युवा नेता प्रतीक केराम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला किनवटमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कलावती गार्डन, माहूर रोड येथे झालेल्या या शिबिरात ३ हजारांहून अधिक नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली असून, १ हजारांपेक्षा अधिक मोतीबिंदू रुग्ण आढळून आले. महात्मे आय हॉस्पिटल, नागपूर, पद्मश्री डॉ. विकास महात्मे सोशल फाउंडेशन, संदेश केराम सोशल फाउंडेशन, किनवट-माहूर आणि जंगो रायताड प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, एम्स नागपूरचे चेअरमन तथा माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने नागरिकांची तपासणी केली.शिबिरात मोतीबिंदूसह रेटिना व अन्य नेत्रविकारांची तपासणी करण्यात आली. गरजू रुग्णांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तपासणीनंतर मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या १ हजारांहून अधिक रुग्णांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील महात्मे नेत्र रुग्णालयात नेण्यात येणार आहे. या रुग्णांच्या शस्त्रक्रिया, औषधे व आवश्यक वैद्यकीय सेवा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पात्र रुग्णांना १५ ऑगस्टला नागपुरात नेणार
मोतीबिंदू अथवा अन्य शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरलेल्या रुग्णांना १५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता आमदार भीमराव केराम यांच्या वतीने मोफत बसने नागपूर येथे नेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण व दुर्गम भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.
महात्मे यांनी केले शिबिराचे कौतुक
पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी शिबिराला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त करत, किनवट-माहूर परिसरातील गरजू रुग्णांना नेत्रसेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले.
आमदार भीमराव केराम यांनी शिबिराच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणारे आरोग्यदूत अमन कुंडगीर यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांना वेळेवर आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, या उद्देशाने अशा उपक्रमांना प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रक्तदानातूनही सामाजिक बांधिलकी
दरम्यान, स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कलावती गार्डन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आरोग्यसेवेचा जागर : वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, औषधोपचार आणि रक्तदान अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. दुर्गम भागातील हजारो गरजू नागरिकांना थेट आरोग्यसेवेचा लाभ मिळाल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

COMMENTS