माहूर (प्रतिनीधी) श्री रेणुकादेवीचे सेवेकरी कै. विश्वेश्वर माधवराव जोशी यांचे नातू तथा हिवरा एज्युकेशन सोसायटी, हिवरा येथील सेवानिवृत्त पर्यवेक्षक नंदकुमार जोशी यांचे ज्येष्ठ चिरंजीव प्रा. पवन नंदकुमार जोशी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या वतीने इंग्रजी विषयात नुकतीच विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
प्रा. पवन जोशी यांनी “Selected Plays of Kalidasa – A Critical Study” या विषयावर संशोधन करून आपली पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधन कार्यास डॉ. प्रसाद जोशी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कालिदासांच्या निवडक नाटकांचा चिकित्सक आणि समीक्षात्मक अभ्यास करताना त्यांच्या साहित्यकृतींचे आशय, कलात्मकता, नाट्यवैशिष्ट्ये, व्यक्तिरेखा, भाषा-शैली तसेच भारतीय सांस्कृतिक व साहित्यिक परंपरेतील योगदानाचा अभ्यास त्यांनी आपल्या संशोधनातून केला आहे.
प्रा. पवन जोशी हे सध्या वनमालाताई राठोड कनिष्ठ महाविद्यालय, आमणी ता. महागांव येथे गेल्या १२ वर्षांपासून इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत. अध्यापनाबरोबरच संशोधनाची आवड जोपासत त्यांनी यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथून एम.फिल. पदवी प्राप्त केली आहे. सातत्यपूर्ण अभ्यास, संशोधनाची जिद्द आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान यामुळे त्यांनी पीएच.डी. पदवी संपादन करून आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे.
प्रा. पवन जोशींनी पदवीचे शिक्षण श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातून तर पीपल्स महाविद्यालय नांदेड येथून पदव्युत्तर पदवी चे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या या यशाचे विशेष कौतुक होत आहे. या यशामागे कुटुंबीयांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि स्वतःची मेहनत व चिकाटी यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे.
या यशाबद्दल आमदार भीमराव केराम, अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पांडे, बळीराम पाटील मिशन मांडवी चे अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, वनमालाताई राठोड , माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड , भाजप नेते ॲड.रमण जायभाये, रुग्ण कल्याण समिती सदस्य अनिल वाघमारे,जेष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले,यांच्या सह सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

COMMENTS