नांदेड: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (नांदेड) यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड...
नांदेड: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण (नांदेड) यांच्या सहकार्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो कायदा’ या विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृती करून सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण करणे हा होता.
मार्गदर्शन व कायदेशीर माहिती: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश शरद देशपांडे यांनी रॅगिंगविरोधी कायदे, त्याचे परिणाम आणि विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांवर भाष्य केले. तसेच ॲड. एम. आर. मुधोलकर, ॲड. शेख शकील आणि ॲड. वैद्य यांनी पीपीटीद्वारे (PPT) पोक्सो कायदा, बालकांचे संरक्षण आणि तक्रार निवारण प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय संदेश: कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांना निर्भय व सुरक्षित वातावरण देणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत शिस्त व परस्पर सन्मानाचे आवाहन केले. प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनीही अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद: कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी रॅगिंग प्रतिबंध आणि पोक्सो कायद्यासंदर्भात विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी केले, तर आभार डॉ. मारोती गायकवाड यांनी मानले. या शिबिराला विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS