नांदेड : गीता परिवार नांदेडच्या वतीने हनुमान पेठ, वजीराबाद, येथील कर्मवीर साहेबराव बारड़कर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश वितरणाचे कार्यक्रम आयोजीत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दानशूर स्व शंकरलालजी धुत यांना श्रद्धांजलि अर्पित करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून रमेश डागा अध्यक्ष सालासर भजन मंडळ, नांदेड, गंगाप्रसाद तोषनीवाल प्रसिद्ध उद्योजक, गंगाबिशन कांकर कार्याध्यक्ष, गीता परिवार मराठवाडा तसेच ॲड. सी. बी. दागडिया, ॲड. बी. एच. निरणे आणि सुनील गट्टाणी, नारायण मामडी यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे गंगाप्रसाद तोषनीवाल यांनी सांगितले. आजचे विद्यार्थी म्हणजे उद्याचे भविष्य आहेत, संस्कारशील विद्यार्थी घडविणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे असे प्रतिपादन रमेश डागा यांनी केले. प्राथमिक शाळेच्या चाळीस विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य पाहुण्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचलन मुख्याध्यापिका चंद्रलेखा फूलसे यांनी केले तर आभार सुनील गट्टाणी यांनी केले व गीता परिवाराच्या कार्याची माहिती सांगितली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. सारिका बंग,सौ. डॉ. उर्मिला मालू, नारायण मामडी, शिक्षिका पारडेवार तसेच गीता परिवार नांदेडचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले
गीता परिवार नांदेडच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

COMMENTS