नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोल...
नांदेड परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी आपल्याकडील अधिकारी व अंमलदारांचे एक पोलीस पथक लातूर व हिंगोली जिल्हयात रवाना केले होते.
सदर पथकाने, दिनांक 19.08.2026 रोजी लातूर जिल्हयातील गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मटका बुकीवर कारवाई करत, 52,770/- रुपयांची रोकड, 1,07,000/- रुपयांचे (9) मोबाईल, 30,000/- रुपयांचे (2) टॅबलेट, व 2,13,500/- रुपयांचे संगणक साहित्य असा एकूण 4,03,270/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, नमूद प्रकरणात एकूण (11) इसमांना ताब्यात घेवून, त्यांचेविरुध्द गांधी चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 585/2026 व 586/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.तसेच, आज दिनांक 20.08.2026 रोजी हिंगोली जिल्हयातील औंढा नागनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे अनखळी गावात माणिक यशवंतराव गारकर यांचे घरी साठवून ठेवलेला 1,42,780/- रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणी माणिक यशवंतराव गारकर व संजय बाळासाहेब गारकर रा. अनखळी ता. औंढा, जिल्हा हिंगोली यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
उपरोक्त दोन्हीही कारवायांत, एकूण (13) आरोपींकडून 52,770/- रुपयांची रोकड, (11) मोबाईल, संगणक साहित्य व गुटखा असा एकूण 5,46,050/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोहेकॉ/ प्रदिप खानसोळे, पोहेकॉ/ गणेश राठोड, पोहेकॉ/ संदिप वाघाडे व पोहेकॉ/ गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.
' खबर ' हेल्पलाइन वरुन माहिती द्या : अवैध व्यवसायांची माहिती थेट पोलीसांना पोहोचविता यावी, या दृष्टिकोनातून, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेली 'खबर' नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, सदर हेल्पलाइन वरून नागरिकांनी आपल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयापर्यंत पोहचवावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री. शहाजी उमाप यांनी केले आहे.

COMMENTS