परिवर्तनवादी चळवळीचा नायक : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे

  महाराष्ट्राला प्रबोधनाची प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे, तद्वतच या महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांची आणि त्यांच्या अखंड कार्याची दैद...
 
महाराष्ट्राला प्रबोधनाची प्रदीर्घ अशी परंपरा लाभलेली आहे, तद्वतच या महाराष्ट्राला महापुरुषांच्या विचारांची आणि त्यांच्या अखंड कार्याची दैदिप्यमान असा वारसाही लाभलेला आहे. आपल्या शाहिरीतून महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीची ज्वाला तेवत ठेवण्यात अनेक शाहिरांचे महत्त्वपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण योगदान राहिलेले आहे. त्यातीलच एक म्हणजे "पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तरलेली नसून. कष्टकरी, कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे." असे विज्ञानवादी विचार मांडणारे साहित्यरत्न , लोकशाहीर आण्णाभाऊ साठे होत. या महामानवाचा जन्म एक ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांची मूळचे नाव तुकाराम भाऊ साठे हे होते मात्र अण्णाभाऊ साठे या नावाने ते भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले. अण्णाभाऊ साठे हे एक सच्चे समाज सुधारक, लोककवी आणि लेखक म्हणून विख्यात आहेत. अण्णाभाऊ साठे यांची लेखणी सामाजिक, राजकीय परिवर्तनासाठी सदैव कार्यरत राहिली , त्यांचे लेखन म्हणजे सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेली असून, समाज परिवर्तनासाठी अत्यंत प्रभावी आहे, गरीब दलीत कुटुंबात जन्म होऊन ही परिस्थितीवर मात करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती गरीबीवर मात करण्यासाठी भाकरीच्या शोधात सुमारे 300 की.मी. पायी चालत मुंबईला येऊन तेथील कष्टकरी, कामगारांचे ते उद्धार करते बनले. अण्णाभाऊ साठे मुंबईत वास्तव्यात असताना अपार कष्ट करून, हमाली करून, मजुरी करून , गिरणीत काम करून, दिवसाची रात्र करून वाचनाचा व्यासंग जोपासून, समाजासाठी देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा निर्माण करतो. दुसऱ्यांचे दुःख, वेदना साहित्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन, लोकनाट्य , कविता कहानी च्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा ध्यासच जणू अण्णाभाऊ साठे यांनी घेतला होता. अण्णाभाऊ साठे यांनी एका हातात डब घेऊन दुसऱ्या हातात लेखणी घेऊन महापुरुषांची परिवर्तनाची भाषा बोलून , परिवर्तनासाठी न्याय मिळवून देण्यासाठी गरीब , मजूर, कामगार यांच्यासाठी कार्य करत अण्णाभाऊ साठे यांनी मराठीतून 35 कादंबऱ्या 15 लघुकथाचा संग्रह रशियातील भ्रमंती 13 पटकथा आणि पोवाडा शैलीतील 10 गाणी इत्यादी विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केले. अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या "फकीरा" कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार प्राप्त झाला. तसेच या कादंबरीवर सिनेमाही प्रकाशित झाला. ही बाब म्हणजे समस्त मातंग समाजासाठी अभिमानाची आणि गौरवाची आहे.अन्न भाऊ साठे हे खरे देशभक्त, राष्ट्रभक्त होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लेखणी आणि आपल्या बुलंद आवाजाची कमाल महाराष्ट्राला दाखविली होती. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे लोकशाहीर होतात. मराठी रसिका साठी साहित्यरत्न तर अशिक्षित कामगार , मजूर यांचे उद्धार करते म्हणून संबोधले जातात. कथा, कादंबरी, वगनाट्य, कवणे ,लावण्या असा अक्षरांचा नेटका प्रपंच करून मराठी भाषेची अस्मिता वाढविण्यासाठी तसेच दिन- दुबळ्यांचे दुःख व्यक्त करण्यासाठी त्यांनी उपयोग केला. त्यांचे समस्त जीवन धगधगत्या ज्वालासारखे होते. मनात, मस्तीष्कात, डोळ्यात त्यांच्या वेदना ज्वालासारख्या उफाळून येत असत. आणि त्या ज्वाला गोरगरिबांसाठी लेखणीचे रूप धारण करत असत. अण्णाभाऊ साठे यांच्या अंगी अनेक गुण होते. जगाच्या उघड्या शाळेत, निसर्गाच्या सानिध्यात त्यांनी अनेक धडे घेऊन वेळप्रसंगी साहित्य सुजन तर केलेच परंतु अनेक प्रकारची कामे केली . जसे ढोलकी, तुनतुने , डफ वाजविणे याबरोबरच मोल मजुरी करून तमाशात काम केले, पाहताक्षणी त्यांच्या डोक्यात शब्दांची जुळवा जुळव करून ते कविता तयार करत असत. घडलेल्या प्रसंगावरती ताबडतोब कविता करत असत .
म्हणून त्यांना प्रतिभावान शीघ्र कवी म्हणून संबोधले जाते. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे अत्यंत निर्भय , धाडसी आणि बंडखोर वृत्तीचे होते हे त्यांच्या शाळा सोडण्याच्या घटनेपासून ज्ञात होते. अन्याय, अत्याचार सहन करण्याची त्यांची वृत्ती नव्हती म्हणून तर परिस्थितीवर मात करून जगण्याची कला त्यांच्या साहित्यातून शिकता येते. त्याचबरोबर देशभक्तीची प्रखर भावनाही त्यांच्या साहित्यातून दृष्टिगोचर होते. अण्णाभाऊ साठे हे मुंबईला आल्यानंतर सुरुवातीला भायखळ्यातील चांदबिबी चाळीत राहिले होते हा संपूर्ण परिसर म्हणजे कामगारांची वस्ती होती तेथील गरिबीत खितपत पडलेले दारिद्र्य आणि कळाहीन जीवन जगणारे आपले बांधव पाहून त्यांना दुःख आवरेना असे झाले . ते हे सर्व पाहून अस्वस्थ झाले हे सगळे दुःख वेदना माणसाच्या नशिबाला आल्या याचा परिणाम त्यांच्या मनावर झाला. आणि त्यांच्यातील साहित्यकार जागा झाला. अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मापासूनच त्यांच्या वाट्याला दारिद्र्य आणि अवहेलनेचे जीने मिळाले होते.
यावर मात करण्यासाठी काहीतरी केले पाहिजे ही प्रेरणा त्यांच्यामध्ये जागी झाली आणि ह्या प्रेरनेतूनच त्यांनी प्रचंड वाचन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कोल्हापूरचे कॉम्रेड दत्ता गव्हाणकर, बार्शीचे मेहबूब हुसेन पटेल तथा कॉम्रेड अमर शेख या तिघांचे नाव स्वर्ण अक्षराने करून ठेवण्यासारखे आहे हे तिघेही प्रतिभावंत साहित्यकार,कवी, शाहीर होते. समाज परिवर्तनासाठी या तिघांनी कम्युनिस्ट पक्षाच्या अंतर्गत 'लालबावटा '. हे कलापथक स्थापन करून लोकजागृतीची चळवळ उभी केली होती . संबंध महाराष्ट्रभर या तीन शाहिरांचा गगनभेदी आवाज परिवर्तनाची भाषा बोलत होता. जसे - "माया माया म्हणुनी मायेची किती सांगती प्रोढीकिरे l नाशिवंत तुझी माया शेवटी ब्रह्मसुख सारे दवडीकिरे I काया खोटी, माया खोटी विचार करून पहा आपण l ग्रंथ मत शास्त्रात पहा रे साधुसंतांचे निरूपण l
अशा प्रकारची शाहिरी करून समाजाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी कार्य केले आहे वरील प्रकारच्या अनेक शाहिरीच्या माध्यमातून तिन्ही शहरांनी महाराष्ट्रभर कार्य करत समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला शाहीरीच्या सुरुवातीला गणपतीची आराधना करतेवेळी कशा प्रकारची शब्दांची सांगड घालून शहरीला सुरुवात करत होते.
जसे- "महाराज गौरी नंदना अमर वंदना हे मंगलमूर्ती ठेवी कृपादृष्टी एकदंत दिनावार पुरती हे स्वयंभू शुभदायका हे गननायका, गीत गायिका आढळ स्फूर्ती . भवसमुद्र जेणेकरून सहजगती तरही. हे देवा कृपादृष्टी एकदंत दीनावर पुरती."
अशाप्रकारे पारंपारिक गणाचे स्वरूप शाहिरीच्या रूपाने स्पष्ट केले आहे साधारणपणे गणामध्ये इतर देवदेवतां पेक्षा गणपतीचे स्तवन करून प्रतिभावंत साहित्यिकांची प्रचिती त्यांनी दिली आहे. निसर्गाचे वर्णन करीत असताना शाहीर आण्णाभाऊ साठे यांनी नद्यांची अशाप्रकारे वर्णन केले आहे की "महाराष्ट्राच्या अंगणात सरिता ह्या खेळ खेळतात . कोयना, कृष्णा चालत घालून हातामध्ये हात. वारणा वाहे वेगात वायूला लाजवीत ". अशा प्रकारे अण्णाभाऊ साठे आणि निसर्ग वर्णन करीत असताना महाराष्ट्राची शान, भौगोलिक परिस्थिती तसेच येथील अवस्था त्यांनी साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. शाहिरीचा महाराष्ट्रभर विविध ठिकाणी केलेल्या कार्यक्रमाचा अण्णाभाऊ साठे यांचा अत्यंत बहराचा कालखंड होता . या कलापथकासाठी गीते, पोवाडे यांची रचना त्यांनी केली. शाहीर अमर शेख यांचा आवाज पहाडी होता . शाहीर अण्णाभाऊ साठे पोवाडा लिहायचे. आणि शाहीर अमर शेख आपल्या बुलंद आवाजात गायचे शाहीर दत्ता गव्हाणकर हे कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा जवळचे महागोंड गावचे. 1935 साली कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून इंग्रजी विषय घेऊन बीए झाले होते. अस्खलित इंग्रजी बोलणारे शाहीर काँग्रेस दत्ता गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे यांच्या सारखेच बेकारी, दारिद्र्य, उपासमार पाहून बेचैन झालेले बंडखोर तरुण होते. श्रीपाद अमृत डांगे यांचा प्रभाव असलेल्या तिघांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला प्रचंड ताकद दिली होती. लालबावटा कलापथकामुळे अण्णाभाऊ साठे यांच्या लेखनाला बहर आला. कला पथकासाठी वगनाट्य, लावण्या, लोकनाट्य, गीते असे त्यांनी खूप लेखन केले . लोकशाहीर म्हणून त्यांना सारा महाराष्ट्र ओळखू लागला .संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे, आचार्य प्र . के. अत्रे, श्रीपाद अमृत डांगे असे अग्रगण्य नेते होते . या नेत्यांच्या भाषणापूर्वी अण्णाभाऊ साठे, अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांची पोवाडे व्हायचे. पोवाडे ऐकण्यासाठी लोकप्रचंड संख्येने गर्दी करत होते. 1950 च्या दशकात अण्णाभाऊ साठे कादंबरी लेखनाकडे वळले. त्यांनी जे वास्तव जीवनात जे पाहिले होते, जे अनुभवले होते , जे भोगले होते ते त्यांच्या लेखनात रसरशीतपणे प्रगट झाले. वारणेच्या खोऱ्यातील त्यांच्या मामाने ब्रिटिशांच्या विरोधात बंड केले होते. त्यांच्या रोमांचकारी कथा त्यांनी लहानपणी ऐकल्या होत्या. त्या कथेवर आधारित त्यांनी फकीरा ही कादंबरी लिहिली . या कादंबरीत अन्यायाविरुद्ध लढणारा एक बंडखोर नायक त्यांनी रंगविला. या कादंबरीला प्रख्यात साहित्यिक भाऊसाहेब खांडेकरांनी प्रस्तावना लिहिली . खांडेकरांनी अण्णाभाऊ साठेंच्या कादंबरीचा गौरव केला होता. या कादंबरीमुळे अण्णाभाऊ साठे यांना लेखक म्हणून मोठी प्रतिष्ठा प्राप्त झाली. महाराष्ट्र सरकारचा 1961 या वर्षीचा " फकीरा " या कादंबरीला पुरस्कार मिळाला . व्यंकटेश माडगूळकर यांच्या बनगरवाडी आणि अण्णाभाऊंच्या फकिराने मराठी कादंबरीला एक वेगळे वळण दिले. त्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या, त्यामध्ये 7 कादंबऱ्यावर चित्रपट निघाले 13 कथा संग्रह 15 वगनाट्य, लावण्या , पोवाडे, छक्कड अशी प्रचंड साहित्य निर्मिती त्यांनी केली आहे. ही पहिली राजकीय छक्कड होती हिला राजकीय संदर्भ होता संयुक्त महाराष्ट्र मिळाला मुंबई महाराष्ट्राला मिळाली परंतु महिना सारखे सुंदर बेळगाव कारवार मात्र कर्नाटकातच राहिले. महाराष्ट्राला ती मिळाली नाही बेळगाव कारवारला सुंदर महिला समजून तो विरह त्यांनी छक्कड मधून गायीले. ति छक्कड प्रचंड गाजली होती. ती आजही तेवढीच लोकप्रिय आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लोकप्रिय लेखनाचे मर्म सांगताना कम्युनिस्ट पक्षाच्या युगांतरमध्ये लिहिलेले एका लेखात म्हटले आहे. मला जे सत्य वाटते तेच मी लिहितो. लिहिताना माझे जे ध्येय आहे त्यास अनुरूप असेल ते लिहितो. कम्युनिस्ट विचारधारेत धर्माला स्थान नाही आणि अण्णाभाऊ साठे कम्युनिस्ट होते, त्यामुळे लिहिणे हाच त्यांनी धर्म मानला होता .त्यांच्या साहित्यातील नायक अन्यायाविरुद्ध झुंजणार आहे. त्यांच्या विचारधारेशी ही सर्व पात्रे एकरूप झालेली आहेत. ते म्हणायचे माझ्या लेखनाचे नायक मला भेटलेले आहेत. माझ्या ध्येयाशी ते संवाद करत आहेत, कल्पनेने मला लिहिता येत नाही .अण्णा भाऊंनी कामगार, कष्टकरी, दलित यांचा दुःखाने फुटलेला टाहो आपल्या साहित्यातून अधिक व्यापक केला. मराठी साहित्यात अण्णाभाऊंचा एवढा दलितांचा पुरुषार्थ पराक्रम कोणीही रेखाटला नाही . मार्क्स , लेनिन गार्गी, यांची तत्वज्ञान त्यांनी ग्रंथात वाचले होते. परंतु प्रत्यक्षात ते त्यांनी कामगारांच्या वस्तीत, दलितांच्या झोपडीत ,मोर्चात, संपात आणि स्वतःच्या संसारात अनुभवले होते. विषमतेचे आणि दारिद्र्याचे जन्मभर चटके त्यांनी सोसले होते. जीवन जगण्याचा प्रत्येकांना हक्क आहे परंतु ते कुरूपतेचे असू नये ते शोषण रहित बंधुत्व व समानतेचे असले पाहिजे असा सुंदरतेचा ध्यास लागलेला हा एक थोर मानवतावादी कलावंत होता. 1944 ते 1969 हा त्यांच्या कर्तुत्वाचा आणि तेवढाच धामधुमीचा कालखंड होता. कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता, कालापथक संयुक्त महाराष्ट्र चळवळ , गोवा मुक्ती आंदोलन असा विलक्षण वेगवान आयुष्यात त्यांनी एवढे प्रचंड लेखन कसे केले या प्रश्नाच्या उत्तराला फक्त नतमस्तकच झाले पाहिजे. अण्णाभाऊ साठे यांचा पिंड क्रांतिकारक होता दबलेल्या माणसाचा पराक्रम ही त्यांच्या लेखनाची एक प्रेरणा होती. त्यांचे साहित्य व कला ही मनोरंजना करिता नसून माणसाला जगण्याचं बळ देण देणारी आहे. अण्णाभाऊंचे दोन विवाह झाले होते, कम्युनिस्ट पक्षांच्या चळवळीत जयवंत बाईशी त्यांचा परिचय झाला परिचयाचे रूपांतर प्रेमात आणि लग्नात झाले. 1945 नंतर अण्णाभाऊ साठे यांचे जीवनात चांगले स्थैर्य लाभले . जयवंता बाईंनी अण्णाभाऊंच्या लेखनाला बळ दिले . अण्णाभाऊंचे जीवन संघर्षशील होते, आयुष्यभर त्यांना खूप दगदग झाली होती, कदाचित त्यामुळे ते अल्पायुषी ठरले. अशा या परिवर्तन वादी चळवळीच्या नायकाचा शुक्रवार दिनांक 18 जुलै 1969 रोजी फक्त 49 व्या वर्षी अंत झाला. त्या वेळी नारायण सुर्वे, बाबुराव बागुल ,राजा ढाले ,दया पवार, प्र. श्री नेरुरकर, वामन होवाळ, काँ. जी. एल.रेड्डी, डॉ. सदा कऱ्हाडे , अर्जुन डांगळे, इत्यादी साहित्य आणि चळवळीतील त्यांचे चाहते त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते. त्यांचे घनिष्ठ मित्र, शाहीर अमर शेख यांना अण्णाभाऊंच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर ते धावत आले . ज्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर दौरे केले ,यांचे पोवाडे बुलंद आवाज गायले ते आपल्या मित्राचे दर्शन घेताना शाहीर अमर शेखाने हंबर्डा फोडला. महाराष्ट्राचा लाडका शाहीर शोषितांचा बुलंद आवाज खामोश झाला होता. या साहित्यासम्राटाला जाऊन आज 57 वर्षे होत आहेत. त्यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी वंदन... मानाचा मुजरा...

  • रमेश महाजन भालेराव
  • अहमदपूर, जि. लातूर
  • मो.8830137104

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group