नांदेड प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पूजा नितीनकुमार वाघमारे यांनी ‘ऑर्गनायझेशनल मॅनेजमेंट’ (संस्थात्मक व्यवस्थापन) या विषयात आपली पीएच.डी. पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. त्यांनी आपले हे संशोधन नामांकित मार्गदर्शक डॉ. बी. एन. शिवाले सर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केले.
पूजा वाघमारे यांनी "कामाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांवर ठेवली जाणारी पाळत आणि त्याचा उत्पादकतेवर होणारा परिणाम" या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल संशोधन केले आहे. त्यांच्या या उत्कृष्ट प्रबंधाचे पुणे विद्यापीठाचे डीन (अधिष्ठाता) आणि वरिष्ठ प्राध्यापकांनी विशेष कौतुक केले.
पूजा वाघमारे या नितीनकुमार वाघमारे यांच्या पत्नी, मारोतीराव व चोत्राबाई वाघमारे मंगनाळीकर यांच्या सूनबाई तसेच त्या मधुकरराव व सुमन गायकवाड यांच्या सुकन्या आहेत, त्यांच्या या यशाबद्दल वाघमारे आणि गायकवाड परिवारासह सर्व स्तरांतून डॉ. पूजा वाघमारे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS