नांदेड दि. १०प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकांना प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. एका ज्येष्...
नांदेड दि. १०प्रसाद वैद्यकीय प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी मराठी भाषेतील उत्कृष्ट पुस्तकांना प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. एका ज्येष्ठ साहित्यिकाला मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मानाने गौरविण्यात येते. यंदा दै. लोकसत्ताचे संपादक आणि लेखक गिरीश कुबेर यांना मातुश्री पद्मिनीबाई बन साधना सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील कवी अजीम नवाज राही यांना प्रसाद बन वाङ्मय पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रसाद बन ग्रंथगौरव पुरस्कारासाठी वसई येथील संगीता अरबुने आणि डॉ. प्र. दि. जोशी पाटोदेकर यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.
रविवार, दि. १२ जुलै रोजी सकाळी दहा वाजता नांदेड येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न होणार आहे. पुरस्कार योजनेचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या निमित्ताने सिद्ध केलेल्या 'प्रसादपर्व' ह्या ग्रंथाचे आणि डॉ. अच्युत बन यांच्या 'ज्वालामुखींच्या प्रदेशात' ह्या प्रवासवर्णनपर पुस्तकाचे प्रकाशन या वेळी होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवनात आयोजित ह्या सोहळ्यात साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अच्युत बन, पुरस्कार समितीचे निमंत्रक डॉ. सुरेश सावंत आणि संयोजक पत्रकार श्री संजीव कुळकर्णी यांनी केले आहे.

COMMENTS