पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे महावितरणला आदेश.आ.जितेश अंतापूरकर यांनी दिले देगलूर:- येथे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात...
पावसाळ्यापूर्वी प्रलंबित कामे मार्गी लावण्याचे महावितरणला आदेश.आ.जितेश अंतापूरकर यांनी दिले
देगलूर:- येथे देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमधील वीज समस्यांचा आढावा घेण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीला स्थानिक पदाधिकारी, नागरिक तसेच महावितरण चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत प्रत्येक गावातील वीजपुरवठ्याशी संबंधित अडचणी, वारंवार होणारे खंडित वीजपुरवठे, कमी दाबाची समस्या, रखडलेली दुरुस्ती कामे आणि पायाभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडल्या. त्यावर आ. अंतापूरकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेत समस्यांच्या तत्काळ निवारणासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.
पावसाळा तोंडावर असताना वीज यंत्रणेची दुरुस्ती, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे व्यवस्थापन, ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळावा, यासाठी कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही आ. अंतापूरकर यांनी दिला.
वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवत वेळबद्ध कृती आराखडा तयार करावा आणि पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित समस्या मार्गी लावाव्यात, असे निर्देश देत आ. अंतापूरकर यांनी नागरिकांच्या मूलभूत सुविधांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले.
देगलूर-बिलोली मतदारसंघातील वीज व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी आ.अंतापूरकर यांचे नेहमीच विशेष प्रयत्न असतात अशी चर्चा मतदारसंघातील नागरीकाकडून केली जात आहे.

COMMENTS