मुंबई, दि. १० जून २०२६ राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे रद्द करण्याचे तीव्र पडसाद देशभर उमटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वात आज दादरमध्ये निवडणूक आयोग व भाजपा सरकार विरोधात तीव्र आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, मोदी सरकार, फडणवीस सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ‘जब जब सरकार डरती है, पुलीस को आगे करती है’, ‘निवडणूक आयोग भाजपाची शाखा आहे’, ‘लोकशाही नाही हुकुमशाही आहे’, अशा प्रकारच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झिनत शबरीन, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ब्रिज दत्त, राणी अग्रवाल, जोजो थॉमस, प्रकाश सोनावणे, श्रीरंग बरगे, विश्वजित हाप्पे, मनिष गणोरे, झीशान अहमद, राजा ठाकूर, श्रुती म्हात्रे. डॉ. मनिष पाटील, राहुल पिंगळे, नवीन सिंग यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेस मुख्यालय टिळक भवनला पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता.
“निवडणूक आयोग भाजपा सरकारच्या हातातले कळसुत्री बाहुली बनले असून सत्ताधारी पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याचे कोणतेही कायदेशीर कारण नाही, कोणताही एफआयआर त्यांच्यावर नाही, तरिही एका खोट्या आक्षेपाची दखल घेत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज बाद करण्यात आली. निवडणूक आयोग व भारतीय जनता पक्ष यांची अभद्र युती असून असे प्रकार भारतीय लोकशाही व संविधानाला अत्यंत घातक आहे. निवडणूक आयोग व भाजपाने लोकशाहीचा गळा घोटण्याचे कृत्य केले असून यामुळे निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला आहे. काँग्रेस पक्ष या लोकशाहीविरोधी शक्तींच्या विरोधात पूर्ण ताकदीने लढा देत राहील”, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
निवडणूक आयोग व भाजपा सरकारविरोधात काँग्रेसचे दादरमध्ये तीव्र आंदोलन. राज्यसभा निवडणुकीत मिनाक्षी नटराजन यांचा अर्ज रद्द करण्याच्या लोकशाही विरोधी कृत्याचा निषेध.
मुंबई, दि. १० जून २०२६ राज्यसभा निवडणुकीत मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाच्या उमेवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशीर व मनमानीपणे...
By admin
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड (विशेष प्रतिनिधी): नायगाव तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या नांदेड शहरातील वामननगर परिसरातील रवींद्र प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून ...
-
'बोधाई' हा एकनाथ आव्हाड यांचा पहिला बालकवितासंग्रह मे २००६मध्ये प्रकाशित झाला. पुढे यथाकाळ ह्या संग्रहाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित ...
-
आधारमधील नाव, जन्मतारीख व इतर तपशील दुरुस्तीच्या अडचणींमुळे तीन ते चार महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी नांदेड - राज्यातील खाजगी अनुदानित,...
-
'मला उंच उडू दे' हा एकनाथ आव्हाड यांच्या नाट्यछटांचा पहिला संग्रह जे. के. मीडियाच्या ज्योती कपिले यांनी २०१७मध्ये प्रकाशित केला आह...
-
राम दातीर माहूर (प्रतिनिधी)माहूर नगरपंचायत निवडणुकीचे वारे आतापासूनच सुसाट झाले असून शहरातील राजकीय हालचालींना उधाण आले आहे. सर्व...
COMMENTS