किनवट : हिमायतनगर येथील रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह तिघांविरुद्ध आदिवासी महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ईस्लापूर पोलीस ठा...
किनवट : हिमायतनगर येथील रामभाऊ सूर्यवंशी यांच्यासह तिघांविरुद्ध आदिवासी महिलेला मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी ईस्लापूर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुपटी येथील १२ महिला दि. १ जून रोजी सकाळी सुमारे १० वाजता हनमंत रेड्डी यांच्या शेतात काडी-कचरा वेचण्यासाठी गेल्या होत्या. काम पूर्ण झाल्यानंतर दुपारच्या सुमारास त्या शेतातील एका लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेत असताना सुधाकर पाटील, रामभाऊ सूर्यवंशी आणि दत्ता सूर्यवंशी हे तेथे आले. त्यांनी संबंधित महिलांना अश्लील व जातिवाचक शिवीगाळ करत, “हे वावर आमचे आहे, तुम्ही येथे कसे आलात,” असे म्हणत फिर्यादी महिलेस मारहाण केल्याचा आरोप आहे.
तक्रारदार शकुंतलाबाई शेषेराव ढाले (रा. कुपटी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाद सोडविण्यासाठी आलेल्या शांताबाई देशमुख यांच्याशीही धक्काबुक्की करण्यात आली. या तक्रारीवरून आरोपी सुधाकर पाटील (रा. सोनारी), रामभाऊ सूर्यवंशी (रा. हिमायतनगर) व दत्ता सूर्यवंशी (रा. कुपटी) यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची गंभीर दखल घेत किनवटचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण मळघणे यांनी मंगळवारी (दि. २ जून) घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या प्रकरणाचा पुढील तपास ते स्वतः करीत आहेत.

COMMENTS