नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्या अ...
नांदेड : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती महोत्सवानिमित्त नांदेड येथे भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, त्या अनुषंगाने दि. ६ मे रोजी शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत जयंती महोत्सव कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी पंढरी जायनूरे यांची तर सचिवपदी दीपक तुडमे यांची निवड करण्यात आली. तसेच उपाध्यक्षपदी दिंगाबर माने व प्रेम देवदे, कार्याध्यक्षपदी शिवकुमार देवकते, कोषाध्यक्षपदी शशिकांत कोणापुरे, सहसचिवपदी प्रेम वीर यांची निवड करण्यात आली. सदस्यपदी सागर काकडे, मल्हारी बैकरे व नारायण कोपनर यांची निवड करण्यात आली.
बैठकीत आगामी जयंती महोत्सव सामाजिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा व विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
यावेळी महेंद्र देमगुंडे, डॉ. राम मदने, ॲड. माणिकराव वाखरडे, गोविंद गोरे, प्रकाश लोहगावे, गजानन सरोदे, विठ्ठल काळे, मल्हार बैकरे, माणिक बोडके, डॉ. सोनटक्के, सुनील खरबे आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS