बत्तीस वर्षाच्या अध्यापन सेवेनंतर मुख्यध्यापक डॉ गिरीशसिंह पटेल सेवानिवृत्त!

शहरातील सर्वात जूनी हिंदी भाषा प्रचार संस्था गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ गिरीशसिंह बालाजीसिंह पटेल आपल्या प्रदीर्घ अध्...

शहरातील सर्वात जूनी हिंदी भाषा प्रचार संस्था गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ गिरीशसिंह बालाजीसिंह पटेल आपल्या प्रदीर्घ अध्यापन सेवेतून आता सेवानिवृत्त होत आहेत. हिंदी भाषेत अध्यापन कार्यासोबतच हिंदीचे प्रचार - प्रसार करण्यात त्यांनी जवळपास तीन दशकं वाहिली. हिंदी साहित्य निर्माण व्हावे व साहित्यिकांना मंच मिळवून देण्यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेत. त्यांच्या सोबत मला स्वतःला अनेक उपक्रमात सहभागी होता आले म्हणून त्यांनी केलेल्या परिश्रमाची मला जाणीव आहे. 

दि. 20 मे, 1968 रोजी गिरीशसिंह पटेल यांचा जन्म शहरातील गाडीपुरा भागात झाले होते. त्यांचे वडील श्री बालाजी सिंह पटेल हे स्वतः अध्यापक आणि मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय गाडीपुरा येथून सन 1983 मध्ये त्यांनी दहावी बॉर्डाची परीक्षा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण केली. नंतर त्यांनी डी. एड., बी. एड., बी. ए., एम. ए. हिंदी, पोलिटेक्निक सारख्या पदव्या मिळवल्या. त्यांना विद्यार्थी दशेत गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचे तत्कालीन मुख्यध्यापक स्व. काशीनाथराव बोर्डे यांचे मार्गदर्शन लाभले त्यामुळे शिक्षणाविषयी त्यांच्या जीवनात गंभीरता निर्माण झाली. पुढे चालून श्री दुर्गादास बोर्डे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी डी. एड. अभ्यासक्रम पूर्ण केला.

 त्यांनी तरुण अवस्थेत प्रा. डॉ नरसिंह प्रसाद दुबे (उदगीर) यांच्या मार्गदर्शनात " नांदेड जिले के उत्तर भारतीय लोकगीतों का अध्यन्न" विषयात हिंदी भाषेतून विद्यावाचस्पति (डॉक्टरेट) मिळवून आपल्या कुटुंबाचे आणि समाजाचे नावलौकिक केले. 


सुरुवातीला डॉ गिरीशसिंह पटेल हे सहायक अध्यापक पदावर रुजु झाले. नंतर जवळपास दहा वर्षे अध्यापक म्हणून गांधी राष्ट्रीय विद्यालयात सेवेत कार्यरत राहिलेत. पण नंतर अचानकपणे संधी चालून आली आणि त्यांना संस्थेने प्राथमिक विभागात मुख्याध्यापक पदाची जवाबदारी सुपुर्द केली. त्यावेळी इंग्रजीच्या वाढत्या प्रभावाखाली मराठी माध्यम आणि हिंदी माध्यमाच्या शाळेकडे विद्यार्थी आणि पालक पाठ फिरवत होते. अशा वेळी त्यांनी परिश्रम करुन शाळेत विद्यार्थीप्रवाह यथावत ठेवलं म्हणायला हरकत नाही. त्यांनी पहिल्यांदाच विद्यार्थियाँसाठी परिवहन सेवा शाळेतर्फे लागु केली. त्यामुळे विविध भागातून आणि दुरुन विद्यार्थी शाळेत येऊ लागले. त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकाँसोबत विश्वासचे नाते कायम केले. त्यामुळे शाळेचे संचालन आणि शिक्षणाचा दर्जा चांगला राहिला. त्यांच्या पाठपुराव्यानेच तत्कालीन खासदार मा. श्री भास्कररावजी पाटिल खतगावकर यांच्या खासदार निधीतून अल्पसंख्याँक योजनेन्तरगत 25 लक्ष रुपायाँचा निधी शाळेला प्राप्त झाला. त्या निधीतून शालेय वर्गाँचे बांधकाम पूर्ण करुन घेण्यात आले.

तत्पुर्वी त्यांनी शालेय मार्फत वर्ष 1996 ते 2016 पर्यन्त नांदेड़ शहर अंतरशालेय स्पर्धाँचे आयोजन केले. त्या स्पर्धाँना मोठे यश लाभले होते. या व्यतरिक्त त्यांनी वर्ष 1997 पासून हिंदी सदभावना रैली कार्यक्रमाची सुरुवात केली आणि सतत तीस वर्षापासून हे उपक्रम सुरु आहे. वर्ष 2015 मध्ये त्यांच्या पुढाकाराने शाळेत राष्ट्रीय बाल साहित्य सम्मेलन कार्यक्रम राष्ट्रीयस्तरावर घेण्यात आला होता आणि तो संस्मरणीय ठरला. हजुरसाहिब साहित्य सम्मेलनात ते शीर्ष पदाधिकारी म्हणून सक्रिय राहिले आणि त्यांच्या मार्फ़त साहित्य सम्मेलन व भाषण कार्यक्रमाँचे आयोजन झाले. 

वर्ष 2022 - 23 मध्ये बालभारती पाठ्यक्रम निर्मिति समिती सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मुंबई हिंदी विद्यापीठाचे दहा वर्षे प्रकाशन मंत्री, परीक्षा अध्यक्ष व नंतर कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची सेवा सुरु आहे. तसेच वर्ष 2023 मध्ये त्यांना गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय या संस्थाचे जनरल बॉडी सदस्य म्हणून नियुक्ती मिळालेली आहे.  म्हणून सेवानिवृत्ति नंतर ही संस्थेची आणि हिंदी भाषेची सेवा यथावत करतील यात शंका नाही. त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सतत 22 वर्षे सेवा वाहिली आहे त्याचे दाण्डगे अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या सेवानिवृत्ती वेळी त्यांच्या पुढील आयुष्यासाठी व चांगल्या आरोग्य आबाधित राहावे यासाठी शुभेच्छा देतो. 

स. रविन्द्रसिंघ मोदी, 

वरिष्ठ पत्रकार, नांदेड़ 

9420654574 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group