नांदेड (प्रतिनिधी) : शतकोत्तर परंपरा असलेल्या नाशिकच्या वसंत व्याख्यानमालेचा ज्ञानयज्ञ १ मे पासून सुरू झाला असून ३१ मे रोजी समारोप होणार आहे. दरम्यान उद्या ३० मे रोजी नांदेड येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सरदार रविंद्रसिंघ मोदी यांचे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहेबजी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान होणार आहे.
सकस, सक्षम आणि तेवढेच सुदृढ विचार पेरण्याच्या या परंपरेचे यंदाचे १०३ वे वर्ष असून, या ज्ञानयज्ञात डॉ. अभय बंग, डॉ. मारुती पवार, प्रा. समीर मीत्रगोत्री, सौ. सरिता कौशिक, डॉ. गजानन घोडके, डॉ. नितीन वाघमोडे, भूषण गरवारे, विजय तळले या दिग्गज वक्त्त्यांची विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने यंदाचे विशेष आकर्षण राहिले आहे.
वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष संगीता बाफणा, सरचिटणीस हेमंत देवरे, खजिनदार अविनाश वाळुंजे व पदाधिकारी, कार्यकारी मंडळातर्फे ही माहिती देण्यात आली.
शनिवार (दि. 30) रोजी सरदार रविंद्रसिंघ मोदी यांचे हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहेबजी 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त व्याख्यान होणार आहे. यावेळी नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा नानक साई फाऊंडेशन चे प्रमुख पंढरीनाथ बोकारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या व्याख्यानमालेचा रविवार दि. 31 रोजी उत्सव नात्यांचा झी मराठी प्रस्तुत ग्रँड फिनाले कार्यक्रमाने समारोप होणार आहे.

COMMENTS