आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय कलेचा गौरव डॉ. बालाजी भांगे यांचे तजिकिस्तान मध्ये विशेष चित्रप्रदर्शन आणि व्याख्यान

नांदेड, दि.१९: नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिध्द् चित्रकार डॉ. बालाजी भांगे यांच्या चित्रप्रदर्शन-हस्तकला या केलेचा ९ ते १५ मे २०२६ दरम...
नांदेड, दि.१९: नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र सुप्रसिध्द् चित्रकार डॉ. बालाजी भांगे यांच्या चित्रप्रदर्शन-हस्तकला या केलेचा ९ ते १५ मे २०२६ दरम्यान तजिकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला. कै.गंगाधरराव भांगे, महावितरण मध्ये कारागीर क म्हणून कार्यरत असताना सण २०१८ मध्ये दुःखद निधन. मुळगाव अर्जापूर, ता. बिलोली. देगलूर व मुंबई येथे त्यांचे शिक्षण झाले. ते उच्च विद्याविभूषित असून, निराळी समाजाची जाण असलेले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी पीएचडी सारखे शिक्षण आत्मसात केले. डॉ.बालाजी भांगे यांना समाजाची व संस्कृातीची जाण असून त्यांनी भारताचे नाव बाहेर देशात उज्वल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात नऊ ते पंधरा मे २०२६ मध्ये आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या भारतीय कलेचा गौरव करण्यात आला.

कला आणि विज्ञान यांचा अद्भुत संगम साधणाऱ्या डॉ. भांगे यांनी रंगांचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव याचा सखोल अभ्यास करून या विषयात पीएचडी संपादन केली आहे. त्यानंतर त्यांनी मानवी मानसिकतेवर रंगांच्या परिणामांचा सूक्ष्म अभ्यास करत पोस्ट डॉक्टरेट (पोस्ट पीएचडी) पदवीही प्राप्त केली आहे.

डॉ. भांगे यांचे हे वैशिष्ट्यपूर्ण संशोधन केवळ कला क्षेत्रापुरते मर्यादित नसून वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय क्षेत्रातही नव्या शक्यता निर्माण करणारे ठरत आहे. आपल्या कलाकृती आणि संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की, रंग हे केवळ सौंदर्याचे माध्यम नसून मानवी मन आणि शरीरावर परिणाम करणारी एक प्रभावी ऊर्जा आहे.

संशोधनासोबतच डॉ. भांगे यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात सातत्याने सृजनशीलता जपली आहे. त्यांच्या कलाकृतींमध्ये भारतीय कला, संस्कृती, परंपरा आणि शास्त्रीय शैलीची समृद्ध झलक अनुभवायला मिळते. याबाबत ते सांगतात, “मला माझ्या देशाचा आणि संस्कृतीचा अभिमान आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेलो तरी भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणे हे माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. भारतीय कला जगभर पोहोचवणे हेच माझे ध्येय आहे.”

याच पार्श्वभूमीवर आता डॉ. बालाजी भांगे यांच्या उत्कृष्ट कलाकृतींचे विशेष प्रदर्शन मध्य आशियातील ताजिकिस्तान देशाची राजधान दुशान्बे (Dushanbe) येथील एका प्रतिष्ठित संग्रहालयात आयोजित करण्यात आले. या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी भारताचे राजदूत राजेश ऊईके तसेच भारतीय दूतावासातील अनेक वरिष्ठ अधिकारी विशेष उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे या प्रदर्शनाला अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली.

या प्रदर्शनाला ताजिकिस्तानसह तुर्की, रशिया, अफगाणिस्तान, ‌ऊझबेकिस्तान आदी विविध देशांतील कला रसिक, अभ्यासक आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने भेट दिली. डॉ. भांगे यांच्या चित्रकृतींना सर्व स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृती, रंगसंगती आणि भावविश्वाचे प्रभावी दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या कलाकृतींचे उपस्थितांनी मनापासून कौतुक केले. अनेक विदेशी पाहुण्यांनी भारतीय कलेची समृद्धता आणि डॉ. भांगे यांच्या अनोख्या शैलीची विशेष प्रशंसा केली.

या विशेष कार्यक्रमादरम्यान डॉ. भांगे यांच्याकडून लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन तसेच विशेष व्याख्यानाचे आयोजनही करण्यात आले. यामध्ये त्यांनी आपल्या कला प्रवासाविषयी, रंगांचे वैज्ञानिक पैलू आणि मानवी मनावर होणाऱ्या त्यांच्या परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कला प्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी हा कार्यक्रम विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.डॉ. बालाजी भांगे आपल्या कार्यातून केवळ वैयक्तिक यश संपादन करत नाहीत, तर भारतीय कला, संस्कृती आणि देशाचा मान जागतिक स्तरावर उंचावण्याचे मोलाचे कार्य करत आहेत. त्यांचा हा आंतरराष्ट्रीय प्रवास भारतीय कलेच्या जागतिक विस्तारातील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group