नांदेड (प्रतिनिधी) :काँग्रेसचे खा. राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर सातत्याने विखारी टीका करणाऱ्या नवनाथ बन या भाजपाच्या ...
नांदेड (प्रतिनिधी) :काँग्रेसचे खा. राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांवर सातत्याने विखारी टीका करणाऱ्या नवनाथ बन या भाजपाच्या राज्य प्रवक्त्याचा काँग्रेस पदाधिकारी तथा भोकर येथील विधानसभा पराभूत उमेदवार तिरूपती ऊर्फ पप्पू कोंढेकर यांच्याकडून सत्कार करण्यात आल्याने नांदेड जिल्ह्यात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ उपक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील रहिवासी आणि आता मुंबई येथे स्थित असलेले भाजप मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा काँग्रेस कार्याध्यक्ष तिरुपती उर्फ पप्पू कोंढेकर यांनी सत्कार केल्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. विशेष म्हणजे, नवनाथ बन हे सातत्याने खा. राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शिवसेनेचे खा. संजय राऊत, तसेच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर टीका करत असतात. त्यामुळे काँग्रेसकडूनच त्यांचा सन्मान करण्यात आल्याने राजकीय पातळीवर खळबळ उडाली असून या कृतीचे विविध अर्थ काढले जात आहेत. कारण नवनाथ बन हे केवळ भाजपाचे प्रवक्ते नसून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतरच दोन्ही माध्यमासमोर येऊन बोलत असतात. त्यामुळे या सत्काराने काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दुसरी बाब म्हणजे नांदेडचे भूमिपुत्र म्हणून आ. श्रीजया चव्हाण यांनी मुंबई येथे भेट घेऊन नवनाथ बन यांचा सत्कार केला होता.
दरम्यान, तिरुपती कोंढेकर यांना खा. राहुल गांधी यांनी भोकर विधानसभा निवडणुकीत उमेदवारी दिली होती. अशा परिस्थितीत राहुल गांधींवर टीका करणाऱ्या व्यक्तीचा सन्मान करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. देश आणि राज्य पातळीवर काँग्रेस-भाजप यांच्यात तीव्र संघर्ष सुरू असताना, नांदेडमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत असल्याची चर्चा रंगली आहे. ‘संघटन सृजन’ या उपक्रमाचा उद्देश पक्ष संघटना मजबूत करणे हा असताना, अशा घटनांमुळे तळागाळातील कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याशिवाय, गेल्या काही काळात स्थानिक पातळीवर काँग्रेसची संघटनात्मक हालचाल मंदावल्याची टीकाही होत आहे. कोंढेकर यांच्या अर्धापूर तालुक्यात काँग्रेस कार्यालयच नसल्याचे सांगितले जात असून कोंढेकर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अनेक बैठकींकडे फिरकलेच नसल्याची चर्चा आहे. निवडणुकीनंतर भोकर मतदारसंघात संघटनात्मक कामकाज ठप्प असल्याने काँग्रेसला निष्क्रियता आली आहे.ब

COMMENTS