लातूर :- निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या शहराची माहेश्वरी सभेच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या नूतन कार्यकारणी मध्य...
लातूर :- निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी या शहराची माहेश्वरी सभेच्या नुतन कार्यकारणीची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. या नूतन कार्यकारणी मध्ये अध्यक्ष म्हणून भगवानदासजी लड्डा यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या निवडीबद्दल औराद व लातूर समाजाच्यावतीने गिरवरकर मंगल कार्यालयात भव्य दिव्य सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गीता परिवार तेलंगणा अध्यक्ष जुगलशेठ बियाणी, माहेश्वरी सभेचे लातूर कार्यालय मंत्री चंदूशेठ लड्डा, प्रो. प्रेमनारायणजी सोनी, अमरशेठ बियाणी, नंदकिशोर व्यास, अशोक शेठ चांडक, पंढरपूर रामबाग मंदिर विश्वस्त येतीराजजी झंवर, प्रदीपजी सोनी , आदर्श व्यास, लक्ष्मीकांत बियाणी, घनश्याम मालपाणी, सचिन सोनी, राजू शेठ झंवर, अरविंद खंडेलवाल, सी.ए. नरेंद्र बियाणी, लक्ष्मीकांत राठी, पुरुषोत्तम मंत्री, दिनेशजी लोया हैदराबाद, हिरानंदजी बियाणी, गणेश चांडक, शैलेश सोनी , सौ. सुनीता लड्डा, सौ. वर्षा बियाणी, सौ. सुनंदा बियाणी, सौ.हेमा बियाणी, सौ. मीरा लड्डा, सौ. हेमा व्यास या मान्यवराच्या उपस्थितीत भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

COMMENTS