शेतकरी कामगार पक्ष आणि तहसील कार्यालयाचा संयुक्त उपक्रम; शेकडो मतदारांनी घेतला लाभ
मुखेड ( विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड येथील प्रभाग क्रमांक ०९ मध्ये 'एसआयआर (SIR) २००२' च्या मतदार यादीतील मॅपिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई आसद बल्खी यांच्या नेतृत्वात आणि तहसील कार्यालय मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रात शिबिराचे आयोजन शहरातील जुन्या नगर पालिकेच्या बाजूला असलेल्या नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे हे शिबिर पार पडले. मतदार यादीतील तांत्रिक त्रुटी दूर करणे, पत्त्यांचे मॅपिंग करणे आणि यादी अधिक अचूक करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. भाई आसद बल्खी यांनी पुढाकार घेऊन प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने हा उपक्रम राबवल्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली.या वेळी छटेवाड बालाजी (सह. शिक्षक, के.प्रा.शाळा ब्रँच),शेख ए.एम. (सह. शिक्षक, नोबल उर्दू प्रायमरी शाळा),सय्यद हाफीज (लिपीक, नगर परिषद कार्यालय),निलेश बादेवाड (सह. शिक्षक, गुरुदेव विद्या मंदिर),सय्यद आर.एच. (सह. शिक्षक, नोबल उर्दू हायस्कूल, होळकर नगर) यांनी निवडणूक विभागाच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी या शिबिरात आपले कर्तव्य बजावले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी भाई आसद बल्खी यांच्या मार्गदर्शनाखाली शबीर बल्खी, खदिर शेख, मोसिन बल्खी , इब्राहिम चाऊस, आणि इलियास कादरी यांनी विशेष परिश्रम घेतले. मतदारांना फॉर्म भरून देणे आणि त्यांना आवश्यक माहिती पुरवण्यासाठी या कार्यकर्त्यांनी मोलाची भूमिका बजावली.या शिबिरामुळे प्रभागातील असंख्य मतदारांच्या नोंदी अद्ययावत होण्यास मदत झाली आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल आणि भाई आसद बल्खी यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

COMMENTS