पाथरी/नांदेड: परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार आणि मटका बुकींच्या अवैध व्यवसायांवर पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री शहाजी उमा...
पाथरी/नांदेड: परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरात सुरू असलेल्या जुगार आणि मटका बुकींच्या अवैध व्यवसायांवर पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) श्री शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. दिनांक २३ मार्च २०२६ रोजी करण्यात आलेल्या या दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये एकूण १३ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून १ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.दोन ठिकाणी धाडसी कारवाई: १. रशिद कॉलनी परिसर: एका शेडमध्ये 'तिर्रट' नावाचा जुगार खेळणाऱ्या ८ जणांना पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ३३,२०० रुपयांची रोकड आणि ७ मोबाईल असा एकूण ८३,२०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. २. नायब हॉटेल परिसर: हॉटेलच्या बाजूला असलेल्या शेडमध्ये 'फन टार्गेट चक्री' (बिंगो) हा जुगार ऑनलाईन पद्धतीने चालविला जात होता. येथे कारवाई करत ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ३६,६०० रुपयांची रोकड, मोबाईल, संगणक आणि इतर साहित्य असा ६६,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पथकाची उल्लेखनीय कामगिरी: पोलीस उपमहानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
अवैध व्यवसायाची माहिती देण्यासाठी 'खबर' हेल्पलाइन!
आपल्या भागात चालणाऱ्या जुगार, मटका किंवा इतर अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवण्यासाठी नांदेड परिक्षेत्राच्या वतीने ९१ ५० १०० १०० हा 'खबर' हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आला आहे. नागरिक या क्रमांकावर फोन करून किंवा व्हॉट्सॲप मेसेजद्वारे गुप्तपणे माहिती देऊ शकतात, असे आवाहन डीआयजी श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.

.jpeg)
COMMENTS