नांदेड: ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वर्षभर घराघरांत ज्ञान पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून नि...
नांदेड: ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता वर्षभर घराघरांत ज्ञान पोहचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांनी दैनंदिन कामाच्या व्यापातून वेळ काढून निसर्गाच्या सान्निध्यात आनंदाचे क्षण वेचले. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून आणि नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने सीताखंडी येथील आनंदधाम व आनंदवन येथे वार्षिक निसर्ग सहल व वनभोजन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.हिरवा झेंडा दाखवून सहल रवाना सकाळी १० वाजता वृत्तपत्र वितरण सेंटर येथून मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष पांडागळे यांनी हिरवा झेंडा दाखवून या सहलीला रवाना केले. यावेळी आयटकचे कॉ. प्रदीप नागापूरकर, ज्येष्ठ पत्रकार कृष्णा उमरीकर, गणपत बनसोडे, गणेश वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.खेळ, गाणी आणि गप्पांची मैफल वृत्तपत्र विक्रेत्यांचे जीवन अत्यंत कष्टाचे असते. हाच ताण हलका व्हावा या उद्देशाने आयोजित या सहलीत विक्रेत्यांनी सहकुटुंब सहभाग नोंदवला. जंगलातून पायी सफर, महिला व मुलांसाठी लिंबू-चमचा, गाण्याच्या भेंड्या, बोधकथा अशा विविध उपक्रमांमुळे वातावरणात एक वेगळाच उत्साह होता. महिला सदस्यांनी या निमित्ताने आपले बालपण आठवल्याची भावना व्यक्त केली.
भोजनाचा आस्वाद आणि मार्गदर्शन निसर्गाच्या कुशीत गोरे यांनी तयार केलेल्या चवदार भोजनाचा सर्वांनी आस्वाद घेतला. यावेळी डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी मार्गदर्शन केले, तर बालाजी पवार यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. ज्येष्ठ विक्रेते सरदारसिंह चव्हाण, देवबा डोरले, बालाजी चंदेल, अनूप ठाकूर, बालाजी सुताडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
जोमाने काम करण्याची मिळाली ऊर्जा "अशा उपक्रमांमुळे कामाचा थकवा दूर होऊन पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची ऊर्जा मिळते," अशी भावना उपस्थित विक्रेत्यांनी व्यक्त केली. या सहलीच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सहसचिव भागवत गायकवाड आणि संदीप कटकमवार यांनी विशेष परिश्रम घेतले. सायंकाळी ७ वाजता अत्यंत आनंदी वातावरणात या सहलीचा समारोप झाला.

COMMENTS