परभणी (क्रीडा प्रतिनिधी).: गुजरात येथील एम. पी. मित्रा इंडोअर स्टेडियम गांधीधाम येथे दि.२३ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित होणाऱ्या 87 व्या सब ज्...
परभणी (क्रीडा प्रतिनिधी).: गुजरात येथील एम. पी. मित्रा इंडोअर स्टेडियम गांधीधाम येथे दि.२३ ते ३१ मार्च दरम्यान आयोजित होणाऱ्या 87 व्या सब ज्युनिअर आणि कॅडेट आंतर राज्य अजिंक्यपद राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत ११वर्षातील मुली,१३ वर्षातील मुली, १५ वर्षातील मुली या
वयोगटांमध्ये परभणी जिल्हाकडून महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्यासाठी कु. आद्या महेश बाहेती हिची निवड झाली आहे.
*राज्य टेबल टेनिस संघात निवड आद्याने सार्थ ठरवली*
2025 या वर्षांमध्ये महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेकडून घेण्यात आलेल्या एकूण सहा राज्य स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिल्यामुळे आद्याची महाराष्ट्र राज्याच्या टेबल टेनिस संघात निवड दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या टेबल टेनिस संघात सर्वात कमी वयात अशी कामगिरी करणारी कु.आद्या पूजा महेश बाहेती ही राज्यातील पहिलीच खेळाडू ठरली आहे.कशी माहिती परभणी जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे सचिव गणेश माळवे यांनी दिली.
आद्या ही भारतीय खेळ प्राधिकरण व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,परभणी यांच्या अंतर्गत चालणाऱ्या खेलो इंडिया प्रशिक्षण केंद्रात टेबल टेनिस प्रशिक्षक श्री चेतन मुक्तावार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेते.
टेबल टेनिसच्या सरावासाठी तिला वेळोवेळी अनिल बंदेल, सचिन पुरी,असद अली,अजय कांबळे, ईश्वर कदम यांचे मार्गदर्शन लाभते. तसेच ऐश्वर्या पाटील (फिजिओ) व कांचन बसेकर (योग प्रशिक्षक) यांचेही सहकार्य मिळते. आद्या स्कॉटिश अकॅडमी या शाळेत इयत्ता पाचवीत शिकत आहे.
टेबल टेनिस संघात निवड झाल्याबद्दल
महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष प्रवीण लुकंड, राष्ट्रीय सरचिटणीस यतिन टिपणीस, जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे, राज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे, कल्याण पोले,क्रीडा अधिकारी मिलिंद साळवे,सुयश नाटकर, रोहन ओंढेकर, परभणी जिल्हा सचिव व राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश माळवे, परभणी सिटी क्लबचे सचिव डॉ. विवेक नावंदर, सह प्रशिक्षक विक्रम हातेकर, पवन कदम, पीयूष रामावत, तुषार जाधव, सूरज भुजबळ, रोहित जोशी, साक्षी देवकाते,भक्ती मुक्तावार तसेच पालकांनी अभिनंदन केले.

COMMENTS