वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसच्या व्यस्त आवर्तनात इंग्रजीत संवाद साधणे, लिहिणे आणि बोलणे सोपे करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात...
वर्क फ्रॉम होम आणि ऑफिसच्या व्यस्त आवर्तनात इंग्रजीत संवाद साधणे, लिहिणे आणि बोलणे सोपे करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील संवाद कौशल्य केंद्राने एक नवीन ब्लेंडेड (ऑनलाइन + ऑफलाइन) अभ्यासक्रम सुरू केला आहे. ‘सर्टिफिकेट कोर्स इन इंग्लिश फॉर कम्युनिकेशन’ या अभ्यासक्रमाद्वारे विद्यार्थी, गृहिणी, कर्मचारी, अधिकारी व प्रशासकीय सहकाऱ्यांना सहजरित्या इंग्रजीचे व्यावसायिक प्रशिक्षण मिळेल, अशी माहिती विद्यापीठाचे प्र. कुलसचिव प्रा. ज्ञानेश्वर पवार यांनी दिली.एप्रिल ते जून दरम्यान चालणाऱ्या या तीन महिन्यांच्या (एकूण ६० तास) कार्यक्रमात ऐकणे, बोलणे, वाचन आणि लेखन (LSRW) या चारही कौशल्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. बारावी उत्तीर्ण असलेली कोणतीही व्यक्ती हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकते.अभ्यासक्रमाची उद्दिष्टे म्हणजे औपचारिक आणि अनौपचारिक संभाषणात आत्मविश्वास निर्माण करणे, शब्दसंपत्ती वाढवणे आणि विश्लेषणात्मक विचारसरणी विकसित करणे. विशेषतः, स्पर्धा परीक्षा व व्यवसायासाठी हा अभ्यासक्रम उपयोगी ठरणार आहे. विविध ठिकाणच्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या मदतीने इंग्रजी शिकण्याची ही दुर्मिळ संधी आहे.दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा प्रभावी वापर करून करिअरला गती देण्यासाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल. इच्छुक उमेदवारांनी प्रा. दिलीप चव्हाण (संवाद कौशल्य केंद्र) यांच्याशी ९४२०६४१५१९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन विद्यापीठाद्वारे करण्यात आले आहे.

COMMENTS