नांदेड- रोजच्या धावपळीतून विरंगुळा मिळावा आणि निसर्गाच्या सानिध्यात घटकाभर आनंद लुटता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटन...
नांदेड- रोजच्या धावपळीतून विरंगुळा मिळावा आणि निसर्गाच्या सानिध्यात घटकाभर आनंद लुटता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे कार्याध्यक्ष बालाजी पवार यांच्या संकल्पनेतून नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने रविवार दि. 22 मार्च रोजी 'निसर्ग सहली'चे आयोजन करण्यात आले आहे.
वृत्तपत्र विक्रेता निसर्ग सहलीचे हे 2 रे वर्षे आहे. दररोज पहाटेपासून ते उशिरापर्यंत नागरिकांच्या दारापर्यंत बातम्या द्वारे जगाची माहिती पोहोचवण्याचे काम करणाऱ्या "माहिती दूत" या कष्टकरी घटकाला एकत्र आणने व त्यांच्या परिवारां सोबत "एक दिवस आनंदासाठी" हा या सहली मागचा मुख्य उद्देश आहे. ही सहल भोकर तालुक्यातील सिताखंडी येथील आनंदधाम व आनंदवन या निसर्गरम्य ठिकाणी जाणार आहे.
रविवारी सकाळी 9.00 वाजता नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचे कार्यालय, वृत्तपत्र वितरण सेंटर, माता गुजरीजी विसावा उद्यान येथून निघणार आहे. या सहलीमध्ये निसर्ग भ्रमंती सोबतच विविध खेळ तसेच वनभोजनासह वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाच्या वतीने वतीने अध्यक्ष चंद्रकांत घाटोळ, उपाध्यक्ष सतीश कदम, सचिव गणेश वडगावकर, कोषाध्यक्ष बाबू जल्देवार, सहसचिव भागवत गायकवाड, का. सदस्य बालाजी चंदेल, बालाजी सुताडे, दिपक नरवाडे यांच्या सह पदाधिकारी मंडळाने सर्व सदस्यांना या सहलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे वृत्तपत्र विक्रेत्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून, यानिमित्ताने सर्वांना एकत्र येऊन संवाद साधण्याची व मुलांना त्यांच्यातील सुप्त गुण दाखवण्याची संधी मिळणार असल्याचे राज्य कार्याध्यक्ष बालाजी पवार यांनी सांगितले आहे.

COMMENTS