उपमुख्यमंञी एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजीराव खतगावकर यांची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याशी विविध विषयांवर चर्चा.

उमरी प्रतिनिधी   महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव तसेच म...



उमरी प्रतिनिधी 

 महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री, शिवसेना मुख्यनेते मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) चे महाव्यवस्थापक बालाजी पाटील खतगावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा करून प्रश्न मार्गी लावण्याची सुचना केली. यात मुखेड, कंधार, देगलूर व बिलोली तालुक्यातील प्रलंबित विकासकामे व अडचणी संदर्भात खालील मुद्दे मांडले

मुखेड–हिब्बट–देगलूर रस्त्यास पूर्ण मंजुरी असूनही अद्याप काम पूर्ण झालेले नाही. काही ठिकाणी काम आडवल्यामुळे पाच ते दहा गावांमध्ये एसटी बससेवा पोहोचत नाही. या कामाकडे मा. जिल्हाधिकारी महोदयांनी लक्ष घालून काम तात्काळ सुरू करावे.लेंडी धरणाच्या नियोजनाअभावी धरणात पाणी साचून मोठी आपत्ती निर्माण झाली होती. अशा घटना टाळण्यासाठी दर तीन महिन्यांनी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झालेल्या कामांचा आढावा घ्यावा. तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक नियोजन करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल, याची दक्षता घ्यावी. येत्या पावसाळ्यात धरण १००% भरेल या दृष्टीने काम केल्यास नागरिक जिल्हा प्रशासनाच्या पाठीशी राहतील. धरणातील गाळ काढण्याचे काम व कालव्यांच्या (कॅनल) कामांना गती देणे आवश्यक आहे. विशेषतः पावसाळ्यापूर्वी लोकसहभागातून गाळ काढण्याचे अभियान राबवावे. CSR निधीतून मशिनरी व डिझेलची व्यवस्था करावी.

मुक्रमाबाद येथील ऐच्छिक पुनर्वसनाबाबत जलसंधारण विभागाच्या सचिवांकडे विनंती करून संबंधित गावांसाठी ऐच्छिक पुनर्वसन मान्य करावे. ज्या लाभार्थ्यांनी रक्कम किंवा प्लॉट घेतले आहेत त्यांना वगळून, ज्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही किंवा ज्यांनी नवीन घर बांधलेले नाही अशा नागरिकांना ऐच्छिक पुनर्वसन लागू करावे.

लोकसहभाग व CSR निधीतून मा. जिल्हाधिकारी महोदय व सेवाभावी संस्थांच्या (NGO) माध्यमातून नवीन घरबांधणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या सर्व संबंधित यंत्रणांचा आढावा घेऊन पंतप्रधान आवास योजना योजनेची सांगड घालून केंद्राचा निधी उपलब्ध करून द्यावा. मुखेड–बाराळी–मुक्रमाबाद रस्त्यावर डोरनाळी, मुक्रमाबादजवळ सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम अपूर्ण असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. दोन्ही ठिकाणची कामे लवकर पूर्ण करावीत.

मुखेड MIDC घोषणेबाबतचा प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सहकार्य करावे.

बिलोली MIDC मंजूर असून त्यातील ३०–४० एकर क्षेत्र सोलार प्रकल्पासाठी देण्यात आल्यामुळे इतर कामे प्रलंबित आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार मिणकी किंवा बामणी येथे शासनाची सुमारे ५०० एकर जमीन उपलब्ध आहे. त्यापैकी ३०० एकर MIDC पूर्व क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रस्ताव तयार करून शासनास पाठवावा. या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल.

वर्ष २०२३ व २०२४ मधील दुष्काळाच्या कालावधीत अनेक शेतकऱ्यांना विमा लाभ मिळालेला नाही. तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेले प्रकरणे तत्काळ मार्गी लावून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. यावर्षीच्या विम्यातील सोयाबीन व इतर पिकांच्या प्रकरणांचाही त्वरीत निपटारा करावा.

कोळनूर गाव अंशतः पुनर्वसनात समाविष्ट नाही. मागील वर्षीच्या आपत्तीत गावात सुमारे ७५% पाणी साचून मोठे नुकसान झाले. या गावाचा सविस्तर आढावा घेऊन जलसंधारण विभागामार्फत अंशतः पुनर्वसन मंजूर करण्याबाबत कार्यवाही करावी. पुनर्वसन न झाल्यास गावास भविष्यात गंभीर धोका संभवू शकतो, याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी.

अशा विविध वरील चर्चेवर  मुखेड, कंधार, देगलूर व बिलोली तालुक्यातील प्रलंबित विकासकामे व आडचणी संदर्भात चर्चा करण्यात आली.

या वेळी अमोल पाटील राजुरकर, बालाजी पाटील कबनुरकर, डॉ. अतुल देबडवार, माजी नगराध्यक्ष  विजयकुमार कुंचनवार, बापुराव पाटील, सुनिल मुक्कावार, नरोजी कोरके, प्रकाश जुगलवार, आकाश कांबळे, शंकर पाटील लुट्टे, बालाजी ढोसने, गजानन साखरे आदीची उपस्थिती होती....

..........

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group