नांदेड- नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे इयत्ता दहावी मराठी व सेमी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाच्या...
नांदेड- नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे इयत्ता दहावी मराठी व सेमी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी शालेय जीवनाचा रंगीबेरंगी मागोवा घेत शाळेविषयीच्या गोड आठवणींना उजाळा देऊन शिक्षका विषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी भविष्यात विद्यार्थ्यांनी माणूस म्हणून जगायला शिका व कोणत्याही क्षेत्रात काम करत असताना त्या क्षेत्रात आपले नाव मिळवून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक शाळेचे पर्यवेक्षिका राजश्री भालेराव यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व्यंकट चिलवरवार व आभार योजना बच्चेवार यांनी मानले. याप्रसंगी अरविंद काळे, उषा कंधारे, मनीषा वानेगावकर, मंजुषा वानखेडे, सरोजना पुलावार, श्रद्धा सावले, मनीषा पालेपवाड, अनिता गुंडेवार,मनोहर राठोड, शिवराज कदम प्रशांत मारलेवाड, प्रमोद मंगनाळे, पवन रत्नपारखी, श्रीराम गाडेकर, बोईवारे, श्रीराम बोईनवाड, मोकाटे मामा, माधव लुटे, गहीलोत यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS