श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थान येथे शिवदीक्षा संस्कार आणि पालखी सोहळ्याचे आयोजन
मुखेड *श्री क्षेत्र बेटमोगरा येथे १४ फेब्रुवारी पासून महाशिवरात्र उत्सवाला आरंभ.* प्रतिनिधी / मुस्तफा पिंजारी
तालुक्यातील श्री क्षेत्र बेटमोगरा येथील श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थान येथे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्र उत्सवाचे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. दि. १४ ते १७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री सद्गुरू १०८ ष.ब्र सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या पावन अधिपत्याखाली हा सोहळा संपन्न होणार आहे.
तीन दिवसीय कार्यक्रम
मठाच्या वतीने भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम चालणार आहेत.
रविवार, १५ फेब्रुवारी: सकाळी १०:०० वाजता शिवदीक्षा संस्कार व अनुग्रह सोहळा पार पडेल. रात्री ८:०० वाजता सामूहिक इष्टलिंग महापूजा आणि शिवजागर होईल.
सोमवार, १६ फेब्रुवारी: सकाळी १०:०० वाजता सकाळी मठातून श्री शिवलिंग स्वामी यांची भव्य पालखी मिरवणूक निघून मुख्य बाजारपेठ मार्गे, चिटमोगरा, टाकळी मार्गे परत बेटमोगरा येथून मन्याड नदी ( छत्रपती) येथून परत मठात येऊन पालखी मिरवणुकी ची सांगता होईल.
मंगळवार, १७ फेब्रुवारी सकाळी १०:०० वाजता सामूहिक इष्टलिंग महापूजा होईल. दुपारी १२:०० वाजता बिल्वार्चन सोहळा संपन्न होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भाविकांसाठी महत्त्वाची तसेच ज्या भाविकांना शिवदीक्षा घ्यायची आहे, त्यांनी स्वतःसोबत लिंग, विभूती, रुद्राक्ष, नारळ आणि स्टील ग्लास सोबत आणने आवश्यक आहे असे मठाच्या वतीने कळविण्यात आले आहे. तरी या मंगलमयी उत्सवात सर्व सद्भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री शिवलिंग बादशहा मठ संस्थान, बेटमोगरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS