नांदेड:( दि.२६ फेब्रुवारी २०२६)
समुद्रामध्ये संपन्न होणाऱ्या जलतरण स्पर्धेत सहभागासाठी साहस, सराव आणि धैर्याची गरज असते. प्रा. ओमप्रकाश गुंजकर यांनी अरबी समुद्रात दि. २२ फेब्रुवारी रोजी गेट वे ऑफ इंडिया परिसरातील जलतरण स्पर्धेत एक किलोमीटर अंतर १४ मिनिटात यशस्वीरित्या पार केले. हे सुयश अत्यंत स्तुत्य आहे; असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र- कुलगुरू आणि यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील जलतरणपटू समाजशास्त्र विभागाचे प्रा. ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर यांनी महाराष्ट्र राज्य अंम्पचुअर ऍक्विटिक असोसिएशनद्वारे आयोजित संक रॉक सी कॉम्पिटिशनमध्ये चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.या सुयशाबद्दल उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, उपप्राचार्य प्रा. कबीर रबडे, पर्यवेक्षिका प्रा. वंदना बदने, डॉ. अजय गव्हाणे, डॉ.एल.व्ही.पदमारानी राव, डॉ. साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, डॉ. विश्वाधार देशमुख, डॉ. वीरभद्र स्वामी, डॉ. मीरा फड, डॉ.शिवराज शिरसाट, डॉ. संजय जगताप, डॉ.बालाजी भोसले, डॉ. एकनाथ मिरकुटे, प्रा.नरेंद्र कंचटवार, लेफ्टनंट प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रा. सचिन अपस्तंभ, डॉ.मुकेश धर्मले, डॉ. रामराज गावंडे, डॉ.मनोज पैंजणे, प्रा. राहुल टिचकुले, डॉ.बी.जी.देशमुख, डॉ.श्रीरंग बोडके, प्रा. एम.एस. कुलकर्णी, प्रा. एस.डी. बोकारे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, जगदीश उमरीकर, बालाजी गाडे, गोपाळराव गुंजकर, किशोर गुंजकर, श्रीकांत गुंजकर आदींनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS