आयुष मंत्रालय भारत सरकार व अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन तर्फे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे आयोजित राष्ट्रीय आरोग्य मेळाव्यासाठी तब्बल 10 ते 15 कोटी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मेळाव्याचा फायदा एकाही शेतकऱ्याला झाला नाही. या मेळाव्याच्या उद्घाटनासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येऊन गेल्या. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे एक रुपयाही न घेता 3 हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीची जागा 2 दिवसांसाठी नि:शुल्क देण्यात आली होती, या जागेवर तब्बल 4 कोटी 10 लाख रुपयांचा निधी खर्च करून हेलिपॅड बनविण्यात आले. राष्ट्रपती निघून गेल्यानंतर आता हे हेलिपॅड उखडण्यात येणार आहे. हे हेलिपॅड बनविण्याचे कंत्राट देखील केंद्रीय आयुष मंत्र्यांच्या निकटवर्तीयालाच देण्यात आल्याचे समजते. हे हेलिपॅड बनविण्याला आमचा विरोध नाही. मात्र हेच हेलिपॅड थोडी दूरदृष्टी दाखवून शेगावातील सरकारी जागेवर तयार करण्यात आले असते तर या हेलिपॅडचा कायमस्वरुपी उपयोग झाला असता. केवळ 2 दिवसांसाठी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या 4 कोटी 10 लाख रुपयांच्या शासकीय निधीचा एकप्रकारे चुराडा झाला आहे. याऐवजी थोडे नियोजन केले असते तर संत नगरी शेगाव ला कायमस्वरूपी हेलिपॅड मिळाले असते. मात्र संबंधित मंत्र्यांनी ही संधी घालवली. या संपूर्ण मेळाव्यासाठी एकूण 10 ते 15 कोटींचा खर्च केल्याचा अंदाज आहे. या आरोग्य शिबिरापासून शेतकऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना कुठलाच फायदा न झाल्याने ही देखील शासकीय पैश्याची उघळपट्टी ठरली आहे. या आयुष मंत्रालयाच्या राष्ट्रीय शिबिरामध्ये 70 स्टॉल चे नियोजन करण्यात आले होते. मात्र केवळ 20 ते 25 स्टॉल प्रत्यक्षात लागले आहेत. तसेच शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी या शिबिराकडे पाठ फिरवली आहे. परिणामी केंद्रीय आयुष मंत्रालयाचे हे राष्ट्रीय आरोग्य शिबीर नियोजनाअभावी सपशेल फेल झाले आहे. सर्वसामान्यांनी पाठ फिरवल्याने जनतेच्या कोट्यवधी रुपयांची नियोजनशून्य उधळपट्टी करून त्याचे लाभार्थी हे केवळ आयुषमंत्री आणि त्यांचे बगलबच्चेच ठरले आहेत हे खेदाने नमूद करावे लागेल #महाभ्रष्टयुती #भ्रष्टयुत
https://x.com/incharshsapkal/status/2026695724214177887?s=48

COMMENTS