नांदेड: "छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर स्वराज्याची निर्मिती केली. हे स्वराज्य खऱ्या अर...
नांदेड: "छत्रपती शिवाजी महाराजांनी जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर स्वराज्याची निर्मिती केली. हे स्वराज्य खऱ्या अर्थाने रयतेचे आदर्श राज्य होते. महाराजांचे हे उदात्त विचार प्रत्येकाने आपल्या प्रत्यक्ष कृतीत आणणे, हाच शिवचरित्राचा खरा सन्मान ठरेल," असे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी केले. नांदेड येथील महावितरण परिमंडलाच्या प्रांगणात शिवशंभू वीज प्रतिष्ठान, महावितरण आणि महापारेषण यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंतीचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून श्री. पवार बोलत होते.
बातमीचे ठळक मुद्दे:मॅनेजमेंट गुरु शिवाजी महाराज: उपलब्ध मानवी संसाधनांचे चोख नियोजन करणारे महाराज एक उत्कृष्ट 'मॅनेजमेंट गुरु' होते, असे पवार यांनी नमूद केले.
प्रशासकीय शिस्त: उद्घाटक तथा महापारेषणचे संचालक श्री. सतिश चव्हाण यांनी महाराजांच्या प्रशासकीय शिस्तीवर आणि नीतिमूल्यांवर प्रकाश टाकला.
ओघवती व्याख्यानशैली: प्रमुख व्याख्याते प्रा. डॉ. निलेश चव्हाण यांनी शिवचरित्रातील विविध पैलू उलगडून दाखवले
उपस्थिती: या सोहळ्याला मुख्य अभियंता किशोर गरुड, अधीक्षक अभियंता श्रीमती निधी गौतम, सहायक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते यांच्यासह महावितरण व महापारेषणचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सांगता जोशपूर्ण शाहिरी आणि पोवाड्यांच्या सादरीकरणाने झाली.

COMMENTS