पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन

 




जिपहा पेनूर येथे रंगले कविसंमेलन; चाचा नेहरू यांच्या वेषभूषेने वेधले लक्ष

नांदेड- स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन संपूर्ण देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. बाल दिनाचे औचित्य साधून लोहा तालुक्यातील पेनूर येथील जिल्हा परिषदेच्या प्रशालेत बालकविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात येथील ज्येष्ठ बालकवी कवयित्रींनी सहभाग नोंदवित आपल्या स्वरचित कवितांनी पं. नेहरू यांना अभिवादन केले. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी, ज्येष्ठ कवी पंडित पाटील बेरळीकर, गजानन हिंगमिरे, अनुरत्न वाचमारे, ज्येष्ठ कवयित्री उषाताई ठाकूर, कवी प्रा. अशोक कुबडे, समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवयित्री रुपाली वागरे वैद्य, सुनिता डरांगे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेतील चाचा नेहरू यांच्या वेषभूषेत असलेली इयत्ता पहिलीची विद्यार्थिनी श्रीशा ढोके ही होती.    पं. नेहरू यांच्या जयंतीनिमित्त प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांच्या यथोचित सत्कारानंतर प्रशालेतील मुलींनी साभिनय स्वागत गीत गाऊन शब्दसुमनाने स्वागत केले. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित भाषणांचा व काव्यवाचनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात प्रशालेतील सृष्टी लक्ष्मण पवार, 

दुर्गा लक्ष्मण पवार, अक्षरा ढेपे, मनिषा आवाड, राजनंदिनी धोंडे, विशाखा रंगवाड, मृद्धी बिजोले, अवनी भालेगावकर, दुर्गा वडजे, शितल पांचाळ, स्नेहा एडके यांनी सहभाग घेतला. तर निमंत्रित बालकवींनी आपल्या स्वरचित आणि बहारदार कवितांनी चिमुकल्यांना खिळवून ठेवले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपक्रमशील मुख्याध्यापक प्रलोभ कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. जी. मोतेवार यांनी व बालकविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा. अशोक कुबडे यांनी केले तर आभार इयत्ता सातवीची विद्यार्थिनी अक्षरा गवते हिने मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सौ. जावळे एस. के, श्री सोने एम. आर, श्री. कंदुलवार ए जी, सौ मुरुडे आर.एम, श्री राऊत जी. बी, श्री मोरे एस.आर, श्री लिंबूरकर व्ही . पी, सौ दांडे एम.एम, सौ मोतेवार एम.जी., श्री पवार एम. एल.,श्री नागठाणे आर. एस, सौ राखेवार यु .जे, सौ शीरशिकर व्ही .एम, श्री केंद्रे बी.बी, श्रीमती मुंडलिक एस. व्ही, श्री कोतवाल एन. टी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रशालेतील विद्यार्थी, विद्यार्थीनी आणि पालकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
माहूर शहरात क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांची जयंती विवीध ठिकाणी साजरी.
इमेज
वंशावळीच्या प्राचीन सरीतून' : अपरिहार्यपणे अवतरलेली भेदक कविता डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
इमेज