श्रीरेणुकादेवी संस्थानच्या दानपेटीतून 40 लक्ष रुपयांचे दान.187 ग्रॅम सोने व चार किलो चांदीचाही समावेश

 


     राम दातीर 

माहूर (प्रतिनीधी )नवरात्र उत्सव व दीपावलीच्या सुट्टीत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठापैकी एकपीठ असलेल्या श्री रेणुकामातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी 40 लाख 74 हजार 609 रोख रक्कम आणि 187 ग्राम सोने व दोन किलो चांदीच्या वस्तू दानपेटीत दान केल्या, याशिवाय मंदिर परिसरातील सात दानपेटीतून 25 लक्ष 37 हजार चारशे चाळीस रुपयांचे संस्थानला दान मिळाले, अशी माहिती व्यवस्थापक योगेश साबळे यांनी प्रेसनोट मधून दिली आहे.

    श्री रेणुकादेवी संस्थानच्या मुख्य मंदिरात चार, तर मंदिर परिसरात सात दानपेटी आहेत. बुधवार दि.5 नोव्हें रोजी संस्थांनचे सचिव तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोन्तूला,कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, अरविंद देव, दुर्गादास भोपी व व्यवस्थापक योगेश साबळे यांच्या उपस्थितीत श्रीरेणुका देवी मंदिरातील एकूण चार दानपेटी उघडण्यात आल्या.त्या दानपेटीत भाविकांनी गुप्त दान केलेल्या 500, 200, 100, 50,20,10 व 5 रुपयांच्या नोटा व नाणे असे मिळून एकूण 40 लाख 74 हजार 609 तर 187 ग्राम सोने व दोन किलो चांदीच्या वस्तूंचा समावेश आहे, तसेच सुमारे चौदा महिन्यानंतर श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, श्री भगवान परशुराम मंदिर व मंदिर परिसरातील एकूण सात दान पेट्या उघडल्या, त्यात 25 लक्ष 37 हजार चारशे चाळीस रुपये दान प्राप्त झाले, असा उल्लेख प्रेसनोट मध्ये आहे.मुख्य मंदिरातील चार व मंदिर परिसरातील सात असे एकूण अकरा दानपेटीतून एकत्रितरित्या 66 लक्ष 12 हजार 49 रुपये इतके दान प्राप्त झाले.

 *दि. 22 ऑक्टो.ते 6 नोव्हें. 2025 या कालावधीत संस्थांनच्या कार्यालयातील देणगी विभागात रोख रक्कम, क्रेडिट कार्ड, धनादेश या‌द्वारे एकत्रित 60 लक्ष 96 हजार 908 रुपये उत्पन्न मिळाले असून पातळ विक्रीतून 17 लक्ष 24 हजार 940 रुपये उत्पन्न मिळाले आहे.संस्थांनच्या देणगी विभागात 36 ग्रॅम 679 मिली सोन्याची दागिने व एक किलो पाचशे सहासष्ट ग्रॅम पाचशे वीस मिली चांदीचे दागिने दानातून प्राप्त झाले आहेत* योगेश साबळे व्यवस्थापक श्री रेणुकादेवी संस्थान माहुर

टिप्पण्या
Popular posts
मुंबई टांकसाळ कंपनीतील मान्यतेच्या निवडणुकीत मजदूर सभेचा दणदणीत विजय
इमेज
डॉ. मथुताई सावंत यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा पुरस्कार प्रदान
इमेज
श्री.जगदंबा माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे २० वर्षानंतर एकत्र आलेले दहावीचे माजी विद्यार्थी.
इमेज
माहूर तालुक्यात कार्तिक मासानिमित्त काकड आरतीच्या माध्यमातून गावा गावात होतो रामनामाचा गजर
इमेज