नवी मुंबई सानपाडा येथील बल्लाळेश्वर पतसंस्थेच्या लाडकी बहिण ठेव योजनेचा सांगता सोहळा धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सानपाडा शाखेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक आमुंडकर प्रिंटरचे प्रोप्रायटर सुलोचना आमुंडकर व त्यांचे चिरंजीव जितेंद्र आमुंडकर उपस्थित होते. त्याचप्रमाणे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आनंदराव गावडे, संचालक वसंतराव गावडे, जगन्नाथ दाते, संचालिका सुनिताताई डोंगरे, नीताताई गावडे, सरव्यवस्थापक संजयजी घोगरे, सानपाडा स्थानिक सल्लागार समिती, कोकणरत्न हॉटेलचे मालक सुभाष बारबाल , सानपाडा विभागातील महिला समाजसेविका आणि सानपाडा विभागातील बहुसंख्य महिला सभासद उपस्थित होते.
बल्लाळेश्वर पतसंस्था गेली २६ वर्ष आपल्या सभासदांसाठी विविध उपक्रम राबवत असते. महिला सक्षमीकरणाकरिता विविध योजना देखील वेळोवेळी राबवत असते. संस्थेच्या एकूण १५ शाखा असून रक्षाबंधनच्या शुभमुहूर्तावर खास महिलांकरिता लाडकी बहीण ठेव योजना कार्यान्वित करण्यात आली होती. सदर ठेव योजनेमध्ये एकूण जवळपास दोन हजार महिला सभासदांनी संस्थेमध्ये सहभाग घेतला. संस्थेवर विश्वास दाखवत तीन कोटीच्या ठेवींचे संकलन सर्व शाखा मिळून झाले असून, सर्वाधिक ठेव रक्कम सानपाडा शाखेच्या माध्यमातून जमा झाल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापक संजय घोगरे यांनी दिली. संस्थेमध्ये पैसे ठेवल्यानंतर सर्वच संस्था ठेवीला व्याजदर देत असतात. सदर ठेव योजनेस ९ टक्के व्याजदर देऊन प्रत्येक शाखेमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांकरिता लकी ड्रॉच्या माध्यमातून मानाची पैठणी देण्याचा उपक्रम संस्था मागील दोन वर्षापासून राबवत आहे. या योजनेला बहुसंख्य महिला सभासदांनी भरघोस प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे संस्थेमधील कर्मचारी वर्ग अतिशय कुशल व सेवाभावी असून परिवारासारखी सर्व सभासदांची काळजी घेत असतात. भविष्यकाळात संस्थेची प्रगती अशीच दैदीप्यमान होऊन संस्था महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था होईल अशी अपेक्षा व्यक्त करून दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे नवी मुंबई विभागातील प्रसिद्ध उद्योजक आमुंडकर प्रिंटरचे प्रोप्रायटर सुलोचना आमुंडकर यांचा ४० वर्षाचा प्रेरणादायी प्रवास नमूद केला. सर्व महिलांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात प्रगती करावी व संस्थेच्या जास्तीत जास्त सेवा सुविधांचा लाभ घ्यावा असे सुचवले व सर्व उपस्थित महिला सभासदांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व सभासदांचे नेरूळ शाखेचे शाखाधिकारी मयूर जगताप व सानपाडा शाखेच्या शाखाधिकारी संगीता आहेर यांनी आभार मानले .
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा