नवी मुंबई सानपाडा येथे महाराष्ट्राचे वनमंत्री, नवी मुंबईचे शिल्पकार आणि लोकनेते मा. श्री. गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त १४ सप्टेंबर २०२५ रोजी भाऊ भापकर मित्र मंडळ व अखंड हरिनाम सप्ताह सानपाडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा भवन येथे ह. भ. प. शंकर महाराज शेवाळे यांचे समाज प्रबोधनपर कीर्तन झाले.
याप्रसंगी ठाणे लोकसभेचे मा.खासदार मा. संजीव नाईक यांच्या शुभहस्ते ह.भ.प.शंकर महाराज शेवाळे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मा. खासदार संजीव नाईक यांनी शुभेच्छापर भाषण केले. या कीर्तन सोहळ्यास भाजप उत्तर भारतीय सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश राय, कुलस्वामी क्रेडिट सोसायटीचे संचालक संजय चव्हाण, संचालक विजय नाना शेळके , समाजसेवक वैभव भास्कर , राजूशेठ सैद, गणेश हुले, गणेश कमळे, दत्ता पाटील , ज्ञानेश्वर म्हात्रे , राजूशेठ वराळ, जयंत नाईक , समाजसेविका जयश्री दंडवते, राजश्री कमळे , वृषाली चव्हाण तसेच अष्टविनायक भजन मंडळ, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, उपाध्यक्ष विठ्ठल गव्हाणे, खजिनदार विष्णुदास मुखेकर, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, नारायण भोर, मराठा विकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी ज्ञानेश्वर जाधव, पांडुरंग वाजे, शिवाजी पाटील, मिलेनियम टॉवर बी टाईप सोसायटीचे पदाधिकारी निवृत्ती ढोबळे, प्रभाकर भेरे, सानपाडा ७.५० गार्डन ग्रुपचे खजिनदार रणवीर पाटील व पदाधिकारी, इतर मान्यवर आणि सानपाड्यातील रहिवाशी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा