सुयश कॉम्प्युटर सेंटरच्या वतीने शिक्षकांचा सन्मान


उदगीर / प्रतिनिधी : येथील नगर परिषद येथे गेल्या अनेक वर्षांपासून असलेल्या सुयश कॉम्प्युटर व प्रगती टायपिंग सेंटर तसेच एम. के. सी. एल. संस्था पुणेच्या वतीने उदगीर शहर व तालुक्यातील जवळपास 30 शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात वक्ते श्री. प्रवीणजी भोळे हे होते तर व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील मानकीकर, राष्ट्रवादी शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद गुरमे, श्री. डी. एस. बिरादार सर, सुयश कॉम्प्युटर सेंटरचे संचालक श्री. विठ्ठलराव गौडगावे यांची उपस्थिती होती. प्रारंभी श्री. गौडगावे सरांनी आपल्या प्रस्थाविकात सुयश कॉम्प्युटरची प्रगती व शिक्षकांच्या सन्मानाबद्दल आपली भूमिका मांडली. त्यानंतर उदगीर शहर व तालुक्यातील जवळपास 30 शिक्षकांचा मान्यवराकडून सन्मान करण्यात आला.त्यात प्राचार्य प्रवीणजी भोळे, मुख्याध्यापक अंगद हाक्के, श्री. गोरे नरसिंग, प्राचार्य सौ. अनुराधा गुरमे, श्री. ज्ञानेश्वर बिरादार, श्री. ज्ञानेश्वर केंद्रे, श्री. मच्छिन्द्र सूर्यवंशी, सौ. संगीता सोनाळे, सौ. मंजुषा कुलकर्णी, श्री.मटके उमाकांत, सौ. वर्षारांणी पाटील, सौ. वर्षा बिरादार, सौ. वर्षा सेलूकर,श्री. बिल्लापले दिलीप, श्री. काळे अप्पाराव, श्री. कातळे सतीश, श्री. पुलागोर सुनील, श्री. पांडुरंग फड, श्री. नवले सुरेश, श्री. बिरादार बालाजी, श्री. चव्हाण मारुती, श्री. दुडिले विक्रांत, श्री. हाळे नामदेव, यासह अन्य काही शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.विशेष म्हणजे श्री. गौडगावे सर हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या सुयश कॉम्प्युटरच्या वतीने शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करतात. कार्यक्रमांस सेंटर मधील प्रशिक्षणार्थी विद्यार्थी , सेंटरमधील स्टॉप व शहरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या