सानपाड्यातील नागरिकांचा आर्चरी केंद्राच्या विरोधात निषेध मोर्चा



नवी मुंबई : सानपाडा येथील सेक्टर १०  मधील कै. डी. व्ही. पाटील मैदानात आर्चरी खेळाचे केंद्र विकसित करण्याकरिता निविदा  प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या आर्चरी केंद्राच्या विकासाला  विरोध करण्यासाठी सानपाडा येथील सर्व राजकीय पक्षांच्या वतीने २२ जुलै  २०२५ रोजी नागरिकांनी निषेध मोर्चा काढून  सर्वच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी  सह्या करून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी निवेदन  दिले आहे. केंद्राचे बांधकाम लक्षात घेतले तर, हे मैदान आर्चरी खेळापुरते मर्यादित राहणार आहे. त्यामुळे  सेक्टर ९, १० व ११ सानपाडा विभागातील नागरिकांकरिता उपलब्ध असलेल्या मैदानात इतर खेळ खेळता येणार नाही. सानपाडा नागरिकांचा आर्चरी खेळाला विरोध नाही,  परंतु नवी मुंबई महानगरपालिकेने या केंद्राला पर्यायी जागा द्यावी,  अशी मागणी लेखी निवेदनात केली आहे. शासनाच्या निर्णयानुसार सामाजिक सांस्कृतिक व सार्वजनिक उपक्रम मैदानात करणे बंधनकारक असल्यामुळे,  सदर  मैदानात बांधकाम झाल्यास हे कार्यक्रम करणे शक्य होणार नाही. म्हणून सर्व पक्षांच्या वतीने  सानपाड्यातील नागरिकांनी २२ जुलै २०२५  रोजी मोर्चा काढून या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. त्यामुळे जनभावनेचा व स्थानिकांच्या विरोध लक्षात घेता विभागातील नागरिकांकरिता एकमेव मैदान उपलब्ध असल्याने सेक्टर १०  मधील कै. डी. व्ही. पाटील मैदानावर आर्चरी केंद्र विकसित करू नये. सदर मैदान सर्व खेळांकरिता व सार्वजनिक उपक्रमाकरिता उपलब्ध व्हावे ही सर्व सानपाडा नागरिकांची मागणी आहे. या मैदानावरील आर्चरी केंद्राची निविदा रद्द न झाल्यास सानपाड्यातील नागरिक तीव्र आंदोलन करतील, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.  या निषेध मोर्चात माजी नगरसेवक सोमनाथ वास्कर, बाबाजी इंदोरे, अजित सावंत, सुनील कुरकुटे,  भाऊ भापकर, मिलिंद सूर्याराव, अजय पवार,  राजेश ठाकूर,  अविनाश जाधव,  पंकज चौधरी, हरिश्चंद्र ठाकूर.  सुनील भैसाने,  तानाजी पाटील, राजू सैद, श्यामराव मोरे व सानपाड्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या