सानपाडा नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्ते रणवीर पाटील यांचा सत्कार

नवी मुंबई : सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अनेक पुरस्कार विजेते, दरवर्षी आपल्या सहकाऱ्यांना डायरी वाटप करणारे  आणि गार्डन ग्रुप ७ :‌५० समूहाचे खजिनदार  रणवीर धनराज पाटील  यांना विमा कंपनीत काम करत करीत असताना बढती व त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल  आत्तापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याबद्दल  त्यांचा २२  जुलै २०२५ रोजी वाढदिवसानिमित्त सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानातील  गार्डन ग्रुप आणि सानपाडा नागरिकांच्या वतीने  पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.  सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, वीमा  योजना ( एल. आय. सी.) कंपनीमार्फत आपल्या सहकाऱ्यांना नेहमी  प्रामाणिकपणे सेवा देणारे, MDRT (अमेरिका) पारितोषिक विजेते, एल आय सी  च्या विविध स्पर्धा विजेते, सर्वांना संकटकाळी मदत करणारे, अनेक बक्षिसे घेऊन प्रगतीचा आलेख  उंचावणारे सामाजिक कार्यकर्ते रणवीर धनराज पाटील यांना  नगरसेवक सोमनाथ वास्कर, सामाजिक कार्यकर्ते भाऊ  भापकर, उध्दव ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख अजय पवार, उपजिल्हाप्रमुख  मिलिंद सूर्याराव, भाजपाचे आबा जगताप, उपशहर प्रमुख  देवेंद्र चोरघे,  शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, शिवसेना ( शिंदे गट )उपविभाग प्रमुख अजित सावंत, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे, उपाध्यक्ष अशोक संकपाळ,  पुरुषोत्तम शिरोळ, सामाजिक कार्यकर्ते  गणपत वाफारे, विकास वाघुले, शिवाजी ढमाले ज्येष्ठ नागरिक मारुती शिंदे इत्यादी मान्यवरांनी त्यांच्या  सामाजिक कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या. गार्डन  ग्रुपची एकजूट दाखवून दिली त्याबद्दल रणवीर पाटील यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले.

आपला

मारुती विश्वासराव

टिप्पण्या