उपविभागीय पोलीस अधिकारी टिपरसे यांचा सत्कार


 *गंगाखेड (प्रतिनिधी)*       महाराष्ट्र शासनाच्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम या उपक्रमा मध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गंगाखेड या कार्यालयाचा विभागामधे प्रथम क्रमांक आल्याबद्दल दिनांक 10 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोपाळ मंत्री, संत जनाबाई सायकलिंग क्लबचे सदस्य शिवप्रसाद मठपती, यशवंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक बालासाहेब शिंदे यांच्यातर्फे उपविभागीय अधिकारी दिलीप टिपरसे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.                                  उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड यांनी कार्यालयातील अभिलेखाचे वर्गीकरण करून कालबाह्य झालेले अभिलेख नष्ट करणे,  गाव पातळीवरील सुरक्षिततेत भर टाकण्यासाठी सि-नेत्र सारखा उपक्रम राबवून लोकसभागातून उपविभागातील कार्य क्षेत्रातील गावांमध्ये एकूण 270 कॅमेरे बसविणे,  एक संवाद विद्यार्थिनींशी या उपक्रमांतर्गत कार्यक्षेत्रातील महाविद्यालय, शाळा, कोचिंग क्लासेस इत्यादी ठिकाणी भेटी देऊन विद्यार्थ्यांना महिलांवरील व बालकांवरील अत्याचारांचे कायदे,  नवीन कायदे, डायल 112, स्वसंरक्षण, गुड टच- बॅड टच अशा  महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करणे, नवीन कायद्यांचा जनतेत प्रसार करणे या व अशा अनेक उपक्रमांमुळे कार्यालयाला हा प्रथम पुरस्कार प्राप्त झाला .

टिप्पण्या