नवी मुंबई : सानपाडा येथील शिवसेना शाखा क्रमांक ७६ च्या वतीने शिवसेना पक्ष प्रमुख मा. श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, विभागातील विद्यार्थ्यांना महानगरपालिकेची शिष्यवृत्ती मिळविण्यासाठी लागणारे उत्पन्नाचे दाखले व शिष्यवृत्तीचे अर्ज वाटप करण्याचा उपक्रम ७ व ८ जुलै २०२५ रोजी शिवसेना शाखा क्रमांक ७६ च्या कार्यालयात उपविभागप्रमुख तानाजी पाटील यांच्या पुढाकाराने व सर्व पदाधिकार्यांच्या व शिवसैनिकांच्या सहकार्याने राबविण्यात आला.त्यास सानपाड्यातील विद्यार्थी व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणार्या सानपाडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखा क्र. ७६ च्या सर्व पदाधिकार्यांना व शिवसैनिकांना धन्यवाद ! कार्यक्रमाचे उदघाटन नवी मुंबई जिल्हाप्रमुख मा. प्रकाशजी पाटील यांनी केले. या सामाजिक कार्यासाठी सर्व ज्येष्ठ शिवसैनिक , उपशहरप्रमुख सुनील गव्हाणे, विभागप्रमुख अजय पवार, उपविभागप्रमुख संदेश चव्हाण, शाखाप्रमुख दत्तात्रय कुरळे, अतुल डेरे, रवी देशमुख ,उपशाखाप्रमुख सुरेंद्र कांबळी, ज्येष्ठ शिवसैनिक अनिल शिरवाडकर, रंजन कळबास्कर, राजदत्त लांडगे हरिश्चंद्र ठाकूर, सुधाकर कुष्टे , शंकरशेठ चिकने , विजय वीरकर , भाऊ गोडसे आणि महिला पदाधिकारी
सौ. वंदना गोडसे, सौ.नलिनी डवले,सौ.आशा पाटील यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल आभार.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा