स्वातंत्र्य सैनिक, माजी खासदार, मुंबईचे माजी महापौर, गोदी कामगारांचे दैवत व ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल यांना ११ व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्पलॉईज युनियनच्या वतीने ऑरेंज गेट प्रिन्सेस डॉक समोरील डॉ. शांती पटेल चौकाच्या नाम फलकाला गोदी कामगारांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर माझगाव येथील कामगार सदन कार्यालयात डॉ. शांती पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून सभागृहात युनियनचे कार्याध्यक्ष डॉ. यतीन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली श्रद्धांजली सभा झाली. या सभेत ज्येष्ठ कामगार नेते डॉ. शांती पटेल, अहमदाबाद येथील विमान अपघात व रेल्वे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी डॉ. शांती पटेल यांनी गोदी कामगारांसाठी केलेली भरघोस पगारवाढ, पेन्शन वाढ, वैद्यकीय सुविधा, कामगार कल्याणकारी योजना, त्यांच्या जीवनातील सामाजिक आणि राजकीय चळवळीतील कार्याच्या आठवणी सांगून युनियनचे पदाधिकारी डॉ. यतीन पटेल, सुधाकर अपराज, विद्याधर राणे, दत्ता खेसे, प्रदीप नलावडे, विजय रणदिवे, मनीष पाटील, विकास नलावडे, मारुती विश्वासराव, मुकुंद वाजे, रमेश कुऱ्हाडे, अविनाश कोलगे, योगिनी दुराफे इत्यादी मान्यवरांनी डॉ. शांती पटेल यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.. सभेला युनियनचे पदाधिकारी, कार्यकर्ते व कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
प्रसिद्धीप्रमुख
मुंबई ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियन
addComments
टिप्पणी पोस्ट करा