मुंबई : नॅशनल रेल्वे मजदूर युनियन (NRMU) कुर्ला मुख्य शाखा आणि जे. जे. ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन न्यू सिक लाईन, कोचिंग कॉम्प्लेक्स, एलटीटी येथे १२ जून २०२५ रोजी करण्यात आले. या शिबिराला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, एकूण ८३ रक्ताच्या युनिट्स जमा करण्यात आल्या.
या शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ सी.डी.ओ श्री प्रताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ए.सी.डी.ओ श्री सुनील कुमार,ए.सी.डी.ओ श्री वीरेंद्र कुमार, ए.आय.आर.एफ चे झोनल सेक्रेटरी कॉ. पी. जे. शिंदे, ए.डी.एस कॉ. के. आर. गोयल, वाडीबंदर सचिव कॉ. गोवर्धन राठोड, कॉ. काळू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी जे. जे. ब्लड बँकेचे डॉ. अजय भिसे आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने मोलाची भूमिका बजावली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेत रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली.
या शिबिराच्या यशस्वीतेसाठी नॅशनल रेल्वे मजदूर युनियन ,कुर्ला मुख्य शाखेचे सेक्रेटरी कॉ. संजय हि. खरताडे यांनी सर्व सहकाऱ्यांचे आणि रक्तदात्यांचे आभार मानले.
त्यांनी दिलेल्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाल्याचे त्यांनी नमूद केले.
addComments
टिप्पणी पोस्ट करा