बालगंधर्व रंगमंदिरामध्ये भारतीय लग्नसंस्कृती जपणारा सांस्कृतिक सोहळा संपन्न*




मुंबई: भारताच्या विविध राज्यात लग्न करण्याच्या  अनेक पद्धती आहेत. भारतीय लग्नसंस्कृती जपणारा  एक आगळावेगळा आणि अनोखे दर्शन घडविणारा विवाह सोहळा  रॉयल व्हिजनतर्फे मनीषा कोलगे आणि प्रियांका घारे यांच्या परिश्रमातून  १४  जून २०२५  रोजी बांद्रा येथील बालगंधर्व रंगमंदिरमध्ये प्रथमच  संपन्न झाला.

गणरायाच्या सुंदर  अशा गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली.  कार्यक्रमात पारंपारिक वधू वर परिधानाचे सादरीकरण, लग्नप्रसंगी होणारे नृत्य, आव्हान पालक संघटनेच्या दिव्यांग मुलांचे  विशेष नृत्य,  महाराष्ट्र, मुस्लिम, मारवाडी, दक्षिण भारतीय,  पंजाबी, गोवा,  बंगाली  लग्न पद्धतीचे खास सादरीकरण झाले.  या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे भारतीय लग्नसंस्कृती आणि परंपरेचे  चांगलीच दर्शन घडले. भारतासारख्या लोकशाही देशात ही लग्न सांस्कृतिक परंपरा जपणे काळाची गरज आहे. 

या कार्यक्रमात  अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर, गिरीजा प्रभू, तेजा देवकर. पुनम चांदोरकर, प्राजक्ता परब, प्रियांका नर,  आरती पानसरे, लावणी सम्राट आशिमीक कामठे, भार्गवी चिरमुले, रूपकला नृत्य अकादमीच्या श्रद्धा गायकवाड, डान्स गुरु रीमा वाघ नृत्य अकादमी,  बरोबरच टीव्ही मालिकेतील अनेक  कलाकार सहभागी झाले होते. याशिवाय मनोरंजन, फॅशन, लोकमत सखी  व सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. सदर कार्यक्रमाचे आयोजन रॉयल व्हिजनचे अध्यक्ष  अविनाश कोलगे, संकल्पना दिग्दर्शन: मेकअप आर्टिस्ट मनीषा कोलगे व सहसंयोजन कालिष्का आभूषण प्रियांका घारे यांनी केले. या सांस्कृतिक  सोहळ्याचे निवेदन विनीत देव यांनी अतिशय सुंदर केले. 

याप्रसंगी चित्रपट अभिनेत्री प्रिया बेर्डे, असिस्टंट पोलीस कमिशनर ॲड. धनराज वंजारी, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे कार्याध्यक्ष डॉ.  यतीन पटेल, सेक्रेटरी विद्याधर राणे, खजिनदार विकास नलावडे इत्यादी अनेक  मान्यवरांचा रॉयल व्हिजनतर्फे  श्रीकृष्णाची फोटो फ्रेम देव सन्मान करण्यात आला. या भारतीय लग्नसंस्कृती सोहळ्यास  मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज  युनियनचे जनरल सेक्रेटरी सुधाकर अपराज, सेक्रेटरी दत्ता खेसे, युनियनचे उपाध्यक्ष व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे  बोर्ड मेंबर प्रदीप नलावडे, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, युनियनचे माजी पदाधिकारी विजय पंदिरकर,मुबई  पोर्ट ट्रस्ट एम्प्लॉईज ग्राहक सहकारी सोसायटीचे पदाधिकारी आप्पा सूर्यवंशी, मराठा विवाह मंडळाचे सहसचिव ज्ञानेश्वर जाधव,  याशिवाय  दिव्यांग बालक,  शिक्षक व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या