नवी मुंबई : सानपाडा येथील बल्लाळेश्वर सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या सानपाडा शाखेचा २३ वा वर्धापन दिन १६ जून २०२५ रोजी संस्थेचे अध्यक्ष आनंद गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. श्री गणेश प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
बल्लाळेश्वर सहकारी पतपेढीचे अध्यक्ष श्री. आनंद गावडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, आपल्या संस्थेचे २६ हजार सभासद असून १५ शाखा कार्यरत आहेत. या संस्थेची १७५ कोटीची उलाढाल असून त्यामध्ये सानपाडा शाखेचा ३५ कोटीचा सहभाग आहे. संस्थेतर्फे गरजू सभासदांना आर्थिक सहाय्य केले जात असून, सभासदांच्या मुलांचा गुणगौरव केला जातो. या शाखेचे सल्लागार मंडळ चांगले कार्य करीत आहे. यापुढेही त्यांनी अशाच प्रकारे कार्य करून सभासद संख्या वाढवावी. असे आव्हान गावडे यांनी केले.
समाजसेवक भाऊ भापकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, सभासदांच्या अडीअडचणीला या संस्थेतर्फे मदत केली जाते, त्याचप्रमाणे रोजगार देण्याचे एक चांगलं कार्य या संस्थेतर्फे होते. पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, गेल्या वर्षी या संस्थेचा विष्णुदास नाट्यगृहात रौप्य महोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. संस्थेचा २६ वा वार्षिक अहवाल तयार असून या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा २२ जून २०२५ रोजी बॉम्बे बंटस सेंटर, जुईनगर येथे होणार आहे. यावरून संस्थेचा कारभार किती पारदर्शक आहे ह लक्षात येते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक श्री. संजयजी घोगरे यांनी केले. तर आभार शाखा अधिकारी वर्षा ताम्हाणे यांनी मानले. सदर कार्यक्रमास सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे खजिनदार सुभाष बारवाल, संचालक वसंत गावडे, संचालिका सौ. निता गावडे, पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व सभासद पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा