सानपाडा येथील सामाजिक बांधिलकी जपणारे समाजसेवक राजूशेठ सैद



नवी मुंबई: सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते, मराठी उद्योजक, उत्तम निवेदक, गणेशोत्सव,  नवरात्र उत्सव,  गुढीपाडवा उत्सव अशा अनेक सांस्कृतिक  कार्यक्रमात नेहमी अग्रभागी असणारे, नेहमी दुसऱ्यांना आनंद देणारे लोकप्रिय समाजसेवक राजुशेठ सैद यांच्या वाढदिवसानिमित्त आज सकाळी सानपाडा येथील सिताराम मास्तर उद्यानात अनेक सामाजिक,  राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील  मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

सानपाडा येथील कै. सिताराम मास्तर उद्यानात २८ मे २०२५  रोजी गार्डन ग्रुप ७.५० च्या वतीने राजू शेठ सैद, उत्तम भोर व  परशुराम शिरोळ यांचा पुष्पगुच्छ देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाजसेवक भाऊ भापकर, नगरसेवक सोमनाथ वास्कर, समाजसेवक अजय पवार, पोर्ट ट्रस्ट कामगार अंकाचे कार्यकारी संपादक मारुती विश्वासराव, सानपाडा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मारुती कदम, समाजसेवक रणवीर पाटील, गार्डन ग्रुपचे अध्यक्ष सदाशिव तावडे आदी  मान्यवरांनी सामाजिक कार्यावर आधारित शुभेच्छा दिल्या. कोणत्याही कुटुंबात सकाळी ८ वाजता शक्यतो वाढदिवस साजरा केला जात नाही. परंतु या गार्डन ग्रुपतर्फे सकाळी गार्डनमध्ये मॉर्निंग वॉक व  योगा करण्यासाठी आलेल्या ७० ते ८० सहकाऱ्यांच्या उपस्थितीत नेहमीच वाढदिवस साजरे केले जातात. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारा हा गार्डन ग्रुप आहे.  यामध्ये  प्रामाणिकपणे  समाजकार्य करणारे राजुशेठ दशरथ सैद,  घरगुती औषधाचे मार्गदर्शन करणारे आरोग्याचे शिल्पकार आयुर्वेदाचार्य उत्तम भोर, गार्डन ग्रुप ७.५०  चे उपाध्यक्ष  परशुराम शिरोळ यांचा समावेश होता.

“माणूस पदाने  मोठा नसतो

तो मोठा असतो आपल्या विचारांनी,

समाजासाठी जपलेली भावना

आणि केलेली सेवा हीच खरी त्याची  ओळख असते.”

राजुशेठ  सैद हे एक नाव, एक व्यक्तिमत्त्व, एक प्रेरणा!

गिरवली ग्रामविकास समितीचे कार्यध्यक्ष, नवी मुंबई सानपाडा विभागातील भावी नगरसेवक, एक कष्टाळू आणि यशस्वी उद्योजक, तसेच समाजाभिमुख दृष्टीकोन असलेले  सानपाडा येथील लाडके व्यक्तिमत्व आहे.

राजुशेठ यांच्या जीवनाचा प्रत्येक टप्पा “सामाजिक बांधिलकी, कर्तव्यनिष्ठा आणि पारदर्शक नेतृत्व” या त्रिसूत्रीवर आधारलेला आहे. ग्रामीण भागातील गरजांकडे आणि शहरी  भागातील विकासाकडे एकाच समरसतेने पाहण्याची त्यांची क्षमता विलक्षण आहे.

त्यांचे चुलते, ह.भ.प. कै. ठकाजीशेठ देवबा सैद कर्नाक बंदर  येथे येथे कष्ट करून आपला संसार उभा केला. गोदीमधील  वाहतूक व्यवसायात त्यांनी आपले नाव कमविले. ठकाजीशेठ सैद म्हणजे एक कीर्तनसंपन्न व्यक्तिमत्त्व, धार्मिकतेचे सजीव उदाहरण होते. त्यांनी आपले संपूर्ण  आयुष्य “विठ्ठल नाम” आणि समाजसेवेसाठी वाहिलं गेलं. आज राजुशेठ सैद हे त्याच आध्यात्मिक आणि सेवा परंपरेचं  कार्य पुढे नेत आहेत.

“धर्म म्हणजे केवळ देवपूजा नव्हे, तर दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण करणं – हीच खरी पूजा!” या विचारांवर ते आजही कार्यरत आहेत. सामाजिक प्रश्नांची जाण, ग्रामीण व शहरी भागातील समस्यांकडे विकासात्मक दृष्टिकोन आणि सर्वसामान्यांसाठी सुलभतेने उपलब्ध होणारी सेवा,  हे त्यांच्या कार्याचे विशेष पैलू आहेत.

विकासकामं, आरोग्य शिबीरं, धार्मिक कार्यक्रम, तरुणांसाठी मार्गदर्शन आणि महिलांसाठी उपक्रम अशा अनेक आघाड्यांवर ते सतत कार्य करीत असतात.

राजुशेठ यांनी व्यवसायाच्या क्षेत्रात प्रामाणिकपणा, नियोजन, आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यांचा उद्देश केवळ नफा नाही, तर रोजगारनिर्मिती आणि इतरांना प्रेरणा देणं हाच खरा ते व्यवसाय मानतात.

“राजुशेठ यांच्या हातून समाजाची व  देशाची सेवा घडो. ही सदिच्छा. 

 त्यांना सानपाडा ७.५०  गार्डन ग्रुप,  भाऊ भापकर मित्र मंडळ,  सानपाडा रहिवाशी मित्र  मंडळ, गोदी  कामगार संघटना, गिरवली ग्रामविकास समिती  इत्यादी संस्थांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 

आपला 

मारुती विश्वासराव

टिप्पण्या