चेंबूरमधील फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे ( FOCUS ) चेअरमन प्रसाद सेनगुप्ता यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार मा. श्री. राहुल शेवाळे यांच्यातर्फे चेंबूर मधील हाउसिंग सोसायटी सभासदांचे व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी २९ मे २०२५ रोजी चेंबूर क्लब हाऊस येथे सभा आयोजित केला होती.
चेंबूर मधील गृहनिर्माण संस्थेच्या सभासदांनी व नागरिकांनी या सभेत रस्त्यांची दुर्दशा, बेकायदेशीर बस पार्किंग, नाले गटारे, लाल डोंगर वरील समस्या, रस्त्याच्या लाईट, सिंधी सोसायटी, डायमंड गार्डनमधील बेकादेशीर भाजीवाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन, चेंबूर स्टेशन जवळील बेकायदेशीर फेरीवाले, गर्दुले, रस्त्यावर गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक, घाटकोपर माहुल रोडवरील ट्राफिक, नारायण गणाचार्य मार्गावरील बेकायदेशीर पार्किंग, मेट्रो रेल्वेची कामे, पोलीस वाहतूक व्यवस्था इत्यादी विषयासंबंधी अनेक तक्रारी मांडल्या. संबंधित सूचनांची व तक्रारीची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी खासदार राहुल शेवाळे, आमदार तुकाराम काते, डीसीपी नवनाथ ढवळे, महापालिका विभागीय अधिकारी शंकर भोसले इत्यादी मान्यवरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर मार्गदर्शन केले व संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमास मुंबई महानगरपालिका, पोलीस वाहतूक व्यवस्था, मुंबई पोलीस या विभागाचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन राहुल शेवाळे यांचे निकटवर्तीय सचिव अनिल त्रिवेदी यांनी केले. कार्यक्रमाचे सुंदर आयोजन केल्याबद्दल फेडरेशनचे चेअरमन प्रसाद सेनगुप्ता यांचा माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सभेला चेंबूर व नेहरूनगर परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होती.
आपला
मारुती विश्वासराव
addComments
टिप्पणी पोस्ट करा