नांदेड - येथील पत्रकार तथा प्रथितयश कथाकार राम तरटे यांच्या सांगावा या कथेने उपस्थित रसिक प्रेक्षक अंतर्मुख झाले. याबरोबरच या कथेने ग्राम जीवनातील सौहार्द अधोरेखित केले. येथील सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी अस्सल ग्रामीण प्रसंग उभे करणारी आणि ग्रामीण बाजाची सांगावा ही कथा भोकर तालुक्यातील मातुळ या गावी नुकत्याच संपन्न झालेल्या पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रात सादर केली. समाजातील दोन जातसमुहांमध्ये सौहार्द निर्माण करणे हे या कथेचे वैशिष्ट्य होते. यावेळी सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष तथा कथालेखक अनुरत्न वाघमारे, नाट्यसंवाद व पटकथा लेखक पांडुरंग कोकुलवार, स्वागताध्यक्ष सतिश पाटील मातुळकर, निमंत्रक बालाजी सूर्यतळे, मुख्य संयोजक दत्ताहरी कदम, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे, कोषाध्यक्ष शंकर गच्चे, जिल्हाध्यक्ष रणजित गोणारकर, सचिव चंद्रकांत कदम, रुपाली वागरे वैद्य आदींची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या पाचव्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती व सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने भोकर तालुक्यातील मातुळ येथे आयोजित करण्यात आले होते. ग्रंथदिंडी, उद्घाटन आणि परिसंवादाचे सत्र यशस्वीरीत्या संपन्न झाल्यानंतर मंडळाच्या वतीने तरटे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या संमेलनाच्या कथाकथन सत्रात सुप्रसिद्ध कथाकार राम तरटे यांनी आपली सांगावा ही कथा सादर केली. उपस्थित श्रोत्यांनी अगदी तल्लीन होऊन या कथाश्रवणाचा आस्वाद घेतला. या सत्राचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रज्ञाधर ढवळे यांनी केले तर आभार सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मानण्यात आले. या सत्रालाही रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या सत्राच्या यशस्वीतेसाठी सप्तरंगी साहित्य मंडळ आणि सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

addComments
टिप्पणी पोस्ट करा